आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डाेपिंग : रशियन रिलेमधील महिला धावपटू युलिआ ठरली दाेषी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिआे - रशियाच्या महिला धावपटूंमधील युलिआ क्रेमाेशान्सकाया ही ‘डाेपिंग टेस्ट’मध्ये दाेषी आढळल्यानंतर तिचा समावेश असलेले २००८ मधील ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीमधील सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या रिआेमधील रिले शर्यतीलाही मनाई करण्यात आली असून युलिआचा २००८ चा नमुना आधुनिक पद्धतीने तपासून ही कारवाई करण्यात आली आहे.

युलिआ आता ३० वर्षांची आहे. तिने २००८ मध्ये दिलेल्या नमुन्याची पुन्हा आधुनिक पद्धतीने तपासणी करण्यात आली. त्यात दाेन प्रतिबंधित घटक आढळून आले आहेत. त्या लढतीत बेल्जियमचा संघ दुसरा, नायजेरिया तिसरा तर ब्राझीलचा संघ चाैथ्या स्थानी हाेता.
फेरतपासणीला प्रारंभ
डाेपिंगविराेधी तज्ज्ञांकडून यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे २००८ आणि २०१२ च्या काही संशयित नमुन्यांचीदेखील या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने फेरतपासणी केली जात आहे.

रशिया चर्चेच्या केंद्रस्थानी
त्या काळात संबंधित तंत्रज्ञान तितकेसे अत्याधुनिक नसल्याचा फायदा संबंधित संशयित खेळाडूंनी घेतला हाेता. या घटनेने खळबळ उडाली असून रशिया पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. याआधीच रशियन खेळाडू डाेपिंग करतात, या आराेपानंतर त्यांच्या रिआे आॅलिम्पिकमधील संघात एक तृतीयांश कपात करण्यात आली हाेती. रशियन खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी तेथील शासनातर्फेच डाेपिंगसाठी भरीस घातले जात असल्याच्या चर्चेला त्यामुळे पुन्हा रिआेच्या उत्तरार्धात उजाळा मिळाला आहे.

या आहेत अन्य तिघी
२००८ च्या आॅलिम्पिकमधील सुवर्णविजेत्या रशियन रिले संघातील अन्य महिला सदस्यांमध्ये अलेक्झांडरा फेडराविया, युलीआ गुश्चीना, येवेजेनिया पाेल्याकाेवा यांचा सहभाग हाेता. त्या डाेपींगमध्ये दाेषी नसल्या तरी एका खेळाडूच्या चुकीमुळे त्यांनादेखील पदकापासून वंचीत रहावे लागणार आहे.

दशकभरासाठी नमुने सुरक्षित
तब्बल दशकभरासाठी नमुने सुरक्षित ठेवण्याची प्रथा आहे. दशकभराच्या काळात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयाेग करुन जर कुणी अॅथलिट काही छुप्या पद्धतीचे डाेपिंग करीत असेल तर ते शाेधून काढण्यात येते.

वेळेत पडताे फरक
युलिआने ज्या प्रकारचे उत्तेजक सेवन केले आहे, ते तत्कालीन चाचण्यांमध्ये दिसू शकत नव्हते. मात्र, त्या उत्तेजकामुळे खेळाडूचा थकवा दूर होण्यास मदत हाेण्यासह खेळाडूला तिची वेळ कमी करण्यातही मदत हाेऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

९८ नमुने दाेषी
या फेरचाचणीमध्ये बीजिंग आणि लंडन अशा दाेन्ही आॅलिम्पिकमधील नमुने तपासण्यात आले. त्यात तब्बल ९८ नमुने दाेषी आढळले आहेत. इतक्या माेठ्या प्रमाणात असे दाेषी खेळाडू आढळल्याने आॅलिम्पिक समितीदेखील संभ्रमित झाली आहे.

बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर भावुक झालेली युलिआ (मध्यभागी)
बातम्या आणखी आहेत...