आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाकडून बीजिंगची दोन पदके हिसकावली, चार रशियन खेळाडूंची पुन्हा चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुसाने - डोपिंगच्या आरोपांचा सामना करत असलेल्या रशियाला आणखी एक धक्का बसला आहे. पुन्हा झालेल्या डोप चाचणीनंतर २००८ बीजिंग ऑलिम्पिक खेळातील रशियाची दोन पदके काढण्यात आली आहेत. बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकच्या १ हजार नमुन्यांपैकी पुनर्परीक्षणात ९८ चे निकाल पॉझिटिव्ह असल्याचे काही दिवसांपूर्वी आयओसीने सांगितले होते. आयओसी खेळाडूंचे नमुने १० वर्षे सांभाळून ठेवत असते.

चार रशियन खेळाडूंची पुन्हा चाचणी करण्यात आली. यात ते दोषी आढळले. यातील बीजिंग खेळांचे त्याचे पदक अमान्य करण्यात आले आहे. यात महिला गटातील भालाफेकीत रौप्यपदक जिंकणारी मारिया अबाकुमोवा आणि रशियाची चार बाय ४०० मी. रिले टीमचे कांस्य जिंकणारा डेनिस एलेक्सिव यांचा समावेश आहे, असे आयओसीने सांगितले.

या दोन रशियन खेळाडूंची पदके परत घेण्यात आली आहेत. रशियाची दोन पदके हिसकावल्यामुळे इंग्लंडला दोन कांस्यपदके मिळू शकतात, तर जर्मनीची भालाफेकपटू क्रिस्टिना ऑबेर्गफोएलला रौप्यपदक, तर चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंडच्या गोल्डी सेयर्सला कांस्यपदक मिळेल. सेयर्सने बीजिंगमध्ये विक्रम केला होता. या स्पर्धेतील सुवर्ण चेक गणराज्यच्या बारबोरा स्पोटाकोवाला मिळाले होते. पुरुषांच्या रिलेत इंग्लंडने चौथे स्थान पटकावले होते. यामुळे त्यांना आता कांस्यपदक मिळू शकते. रशियन संघ त्या वेळी तिसऱ्या स्थानी होता आणि कांस्यपदक जिंकले होते. यात अमेरिका रिले टीमने सुवर्ण जिंकले होते.
बातम्या आणखी आहेत...