आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनने दिले चाहत्याच्या पत्राचे उत्तर !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपल्या आवडत्या सुपरस्टारने सोशल मीडियावर आपल्या एखाद्या पोस्टला उत्तर दिले तर कसा आनंद होईल. निश्चितपणे आपल्या आनंदाला उधाण आल्याशिवाय राहणार नाही. असेच काही घडले सचिन तेंडुलकरचा चाहता करण गांधीसोबत. अमेरिकेत राहणाऱ्या करण गांधीने इन्स्टाग्रामवर सचिनला एक पत्र लिहिले. याचे उत्तर स्वत: सचिनने दिले.   
 
करणने आपल्या पत्रात लिहिले की, “माझे नाव करण आहे. मी यूएसमध्ये राहतो. मात्र, मी मूळ भारतीय आहे. मी तुला क्रिकेट खेळताना बघून लहानाचा मोठा झालो आहे. मी अनेक वनडे आणि डे-नाइट सामने पाहण्यासाठी शिकवणी वर्ग बुडवले. मी तुझा किती मोठा फॅन असल्याचा मला किती अभिमान आहे, हे मला नेहमी सांगण्याची इच्छा होती. सचिन मला माहिती आहे की, तू खूप व्यग्र व्यक्ती आहेस. मात्र, तुझे उत्तर मिळाले तर माझ्या आनंद गगनात मावेनासा होईल. जे मला आवडतात, त्यांची सही मी पत्रावर घेत असतो. तुझी सहीसुद्धा मला पत्रावर मिळाली तर आनंद होईल.’... धन्यवाद. - करण गांधी.  

प्रत्युत्तरात सचिनने उत्तर दिले. सचिन म्हणाला, “मी खात्रीने सांगू शकतो की, जेव्हा वनडे सामने होत असतील, तेव्हा तुझे शिकवणीचे शिक्षक निश्चितपणे आनंदी होत नसतील.’ सचिनच्या या उत्तराला आतापर्यंत १,५३,१५४ लोकांनी लाइक केले आहे. हजारो चाहत्यांनी यावर कॉमेंटही केली आहे. सचिनच्या या उत्तराने आता लाखो सचिनप्रेमींची आशा जागवली असून कधीकाळी सचिन आपल्यासुद्धा पत्रांना उत्तर देईल, असे त्यांना वाटू लागले आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, चाहत्‍याचे पत्र...
बातम्या आणखी आहेत...