आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सचिनचा गाेल्डन पंच; जाेर्गे ग्रिनान पराभूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वर्ल्ड ज्युनियर स्पर्धेतील कांस्य विजेता सचिन सिंग रशियातील एअायबीए यूथ जागतिक बाॅक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने स्पर्धेत शनिवारी ४९ किलाे वजन गटात गाेल्डन पंच मारला. त्याने फायनलमध्ये क्युबाच्या नॅशनल चॅम्पियन जाेर्गे ग्रिनानला धूळ चारली. भारताच्या १६ वर्षीय सचिनने ५-० ने विजय संपादन केला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सचिन हा भारताचा तिसरा युवा बाॅक्सर ठरला. यापूर्वी थाेकचाेम नानाेअ सिंग (२००८) अाणि विकास कृष्णन (२०१०) यांनी या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले अाहे.
बातम्या आणखी आहेत...