आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनचे ‘लिंक्डइन’वर व्यावसायिक लिखाण; पहिल्याच ब्लाॅगमध्ये स्पष्ट केले अापल्या निवृत्तीच्या संकेतांचे गुपित!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गत अाॅक्टाेबर २०१३ मध्ये चॅम्पियन्स लीगमध्ये मी खेळण्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झालाे हाेताेे. या लीगच्या तयारीसाठी मी सकाळीच जिमचे वर्कअाऊट करत हाेताे. मी हे मागील २४ वर्षांपासून नित्यनेमाने करत हाेताे. मात्र, त्या दिवशीची सकाळ माझ्यासाठी काहीशी वेगळीच हाेती. सकाळी लवकर उठण्याची माझी इच्छाच हाेत नव्हती. जिम ट्रेनिंग ही माझ्या क्रिकेटमधील एक अविभाज्य भाग अाहे. मात्र, त्यादिवशी मला काहीही करण्याची इच्छा हाेत नव्हती. 

हेच माझ्यासाठी निवृत्तीचे संकेत हाेेते. त्याच दिवशी माझ्या डाेक्यात निवृत्तीचे विचार अाले. कारण, हा कठीण निर्णय घेण्याची अाता याेग्य वेळ अाली असल्याचेही मला समजले, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नव्या ब्लाॅगमध्ये लिहिले अाहे. त्यानंतर केवळ महिन्यानंतर नाेव्हेंबर २०१३ मध्ये सचिनने निवृत्ती जाहीर केली.   
 
नुकताच सचिन हा प्राेफेशनल नेटवर्किंग साइट ‘लिंक्डइन’वर जाॅइन झाला अाहे. याची माहितीही त्याने टि्वट करून दिली. त्यानंतर त्याने या साइटवर ‘माय सेकंड इनिंग’ नावाने ब्लाॅग लिहिला अाहे. यामध्ये त्याने अापल्या क्रिकेट करिअरमधील अनेक गाेष्टींना उजाळा दिला.   
 
‘सुनील गावसकर हे माझ्या हीराेपैकी एक अाहेत. त्यांनी मला माैलिक सल्लाही दिला. वारंवार हातावरच्या घड्याळीकडे माझे सारखे सारखे लक्ष जात हाेते. कारण, लंच अाणि टी-टाइममधील अंतर किती राहिले, हे मला पाहायचे हाेते. त्या वेळी मला वाटले की अाता अलविदा करण्याची याेग्य वेळ अाली अाहे. असेही गावसकर यांनी मला सांगितले. त्यानंतर त्यांच्या म्हणण्याचा मला अर्थ कळाला. कारण, माझे शरीर अाणि मन यांच्यामध्ये बरेच अंतर निर्माण झाले हाेते. त्याचा परिणाम कामगिरीवर हळूहळू पडत असल्याचेही माझ्या लक्षात अाले,’असेही सचिन म्हणाला.   
 
‘मैदानावर जाताच सचिन....सचिन.... असे चाहत्यांचे शब्द माझ्या कानावर पडत हाेते. मात्र, अाता हाच अावाज माझ्यासाठी लुप्त झाला अाहे.  या सर्व प्रसंगाला सामाेरे जाण्यासाठी माेठे धाडसही लागते. कारण, यापासून दूर हाेण्याची मनाची तयारीच हाेत नाही. त्यामुळे तुम्हाला. निवृत्तीसारखे निर्णय घेताना अनेक कठीण प्रसंगांना सामाेरे जावे लागते, असेही सचिनने स्पष्ट केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...