आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडुलकर, नीता अंबानी रिओत, बिजनेस टायकून मुकेश अंबानीही सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओत ओपनिंग सेरेमनीच्या आधी सचिन तेंडुलकर, नीता अंबानी (मध्यभागी) आणि मुकेश अंबानी (उजवीकडे) - Divya Marathi
रिओत ओपनिंग सेरेमनीच्या आधी सचिन तेंडुलकर, नीता अंबानी (मध्यभागी) आणि मुकेश अंबानी (उजवीकडे)
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय ऑलिंपिक संघाचे गुडविल अॅम्बेसेडर व महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या खास निमंत्रणावरून रिओत दाखल झाला आहे. जेथे त्याने ऑलिंपिक कमिटी मेंबर्सकडून आयोजित डिनरमध्ये सहभाग घेतला. हा इव्हेंट ऑलिंपिक ओपनिंग सेरेमनीच्या आधी झाला. ज्यात सचिनसोबत ऑलिंपिक कमिटीची सदस्य नीता अंबानी सुद्धा दिसली. भारतीय खेळाडूंनाही सचिन भेटणार...
- ऑलिंपिक कमिटीच्या या इव्हेंटमध्ये सचिन इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी सदस्य नीता अंबानीसोबत दिसला.
- नीता अंबानींना दोन दिवसापूर्वी इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीत सहभागी केले आहे.
- नीता अंबानींसोबत त्यांचे पती व उद्योगपती मुकेश अंबानी हे सुद्धा रिओमध्ये आहेत.
- सचिनने या पार्टीतील काही फोटोज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
- ओपनिंग सेरेमनी संपताच सचिन ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना भेटणार आहे.
रिओत फिरतोय सचिन-
- रिओत पोहचलेला सचिन तेथे पिकनिक स्पॉट्सवर फिरताना दिसत आहे.
- तो रियो स्थित जगातील सात आश्चर्यांपैकी एक 'ख्रिस्ट द रिडिमर' स्टॅच्यू पाहण्यासाठी पोहचला.
- येथे सचिनने स्टॅच्यूच्या स्टाईलमध्ये पोझ देऊन फोटो काढला.
- हे फोटो सचिनने आपल्या टि्वटरवर शेयर करीत फॅन्सला विचारले की, मी कोठे आहे?
- याशिवाय सचिनने रिओत आपले फेवरेट नारियल पाणी पितानाचा फोटो शेयर केला आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, रिओत कसा एन्जॉय करत आहे सचिन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...