आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा: पदकतालिकेत भारत अव्वलस्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - भारोत्तोलन, सायकलिस्ट, जलतरणपटू, तिरंदाज व अॅथलिटच्या चमकदार कामगिरीमुळे यजमान भारताने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या सोनेरी अभियानाकडे वेगाने पुढे जात ७८ सुवर्ण, ३६ रौप्य व १० कांस्यपदकांसह एकूण १२४ पदके जिंकली.

भारताने या स्पर्धेत अापले पदकांचे शतक चार दिवसांत पूर्ण केले. श्रीलंकेने १७ सुवर्णांसह एकूण ८७ पदके पटकावत दुसऱ्या स्थानावर, तर पाच सुवर्णांसह ३७ पदके मिळवणारा पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशने चौथे स्थान राखले.

यजमान भारताने भारोत्तोलनामध्ये एकूण ११ सुवर्ण मिळवत आपल्या अभियानाला पूर्णविराम दिला. भारताने सायकलिंगमध्ये एकूण ६ सुवर्ण, तर जलतरणमध्ये ७ सुवर्णांवर नाव कोरले. तिरंदाजांनी काल कंपाउंड प्रकारात ५ सुवर्ण आणि ५ सुवर्ण आपल्या नावावर केले. भारतीय अॅथलिटने शानदार सुरुवात करत ५ सुवर्ण आपल्या खात्यात जमा केले. महिला व्हाॅलीबाॅल आणि खो-खो प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.

पदकतालिका
भारत ७८ ३६ १० १२४
श्रीलंका १७ ३७ ३३ ८७
पाकिस्तान ०५ १२ २० ३७
बांगलादेश ०३ ०८ २७ ३८
नेपाळ ०१ ०५ १३ १९
अफगाण ०० ०२ ०५ ०७
भूतान ०० ०१ ०४ ०५
मालदीव ०० ०१ ०१ ०२