आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅडमिंटन क्रमवारीत सायनाची तिस-या स्थानी घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताची नंबर वन खेळाडू सायना नेहवालला अाॅस्ट्रेलियन अाेपनमधील पराभवाचा जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत माेठा फटका बसला. तिची जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर घसरण झाली. अाॅलिम्पिक चॅम्पियन ली झुईरुईने महिला एकेरीत अव्वलस्थान गाठले.

त्यापाठाेपाठ स्पेनच्या कॅराेलिना मरीनने दुस-या स्थानावर धडक मारली. तिने अाॅस्ट्रेलियन अाेपनचा किताब पटकावून क्रमवारीत दुसरे स्थान गाठले. मरीनने ८०७५२ गुणांची कमाई केली. दुसरीकडे सायनाचे अाता ७९१९२ गुण अाहेत. अाता तिला इंडाेनेशिया अाेपनमध्ये चमकदार कामगिरी करून क्रमवारीत पुन्हा नंबर वनचे सिंहासन काबीज करण्याची संधी अाहे. मात्र, यासाठी तिला पराभवाची मालिका खंडित करावी लागेल. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत १२ व्या स्थानावर धडक मारली. तसेच एचएस प्रणयने १३ वे स्थान गाठले. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा अाणि अश्विनी पाेनप्पा १७ व्या स्थानावर अाहे.

के. श्रीकांतची प्रगती
भारताचा युवा खेळाडू के. श्रीकांतने पुरुष एकेरीच्या क्रमवारीत प्रगती साधली. त्याने अापल्या करिअरमधील सर्वाेत्कृष्ट स्थान पटकावले. त्याने क्रमवारीत तिस-या स्थानावर धडक मारली. त्याने ६७१५७ गुणांची कमाई करून चीनच्या लीन डॅनला पिछाडीवर टाकले.