आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायना उपांत्यपूर्व फेरीत; के. श्रीकांत, ज्वालाचा पराभव, अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - जगातील नंबर वन सायना नेहवालने गुरुवारी अापली विजयी माेहीम अबाधित ठेवून अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र, युवा खेळाडू के. श्रीकांतने अाव्हान कायम ठेवण्यासाठी दिलेली झुंज अपयशी ठरली. तसेच महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा व अश्विनी पाेनप्पालाही पराभवाचा सामना करावा लागला.

दुसऱ्या मानांकित सायना नेहवालने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत चीनच्या सुन युला धूळ चारली. तिने २१-१९, १९-२१, २१-१४ अशा फरकाने शानदार विजयाची नाेंद केली. या विजयाच्या बळावर तिने अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला. यासाठी सायनाला एक तास १८ मिनिटे झुंज द्यावी लागली. अाता तिचा सामना चीनच्या शिजियान वांगशी हाेईल.
श्रीकांत ६८ मिनिटांत पराभूत
इंडिया अाेपन चॅम्पियन के. श्रीकांतला पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभवाला सामाेरे जावे लागले. त्याला चीनच्या तियान हुवेईने ६८ मिनिटांमध्ये धूळ चारली. तियानने १७-२१, २१-१७, २१-१३ अशा फरकाने विजय मिळवला.

ज्वाला-अश्विनीचा पराभव
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्या ज्वाला गुट्टा अाणि अश्विनी पाेनप्पाला महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत ३३ मिनिटांत पराभव पत्कारावा लागला. चाैथ्या मानांकित नित्या कृषीइंदा अाणि ग्रेसिया पाेलने २१-१४, २१-१० ने सामना जिंकला.
बातम्या आणखी आहेत...