आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन : सायनाची झुंज अपयशी, ४२ मिनिटांमध्ये सायना पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - जगातील नंबर वन सायना नेहवालची अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन स्पर्धेतील झंुज अपयशी ठरली. तिला शुक्रवारी महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. यासह गतविजेत्या सायनाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. सायनासह भारताचे सर्वच खेळाडू अाता स्पर्धेतून बाहेर पडले अाहेत. कश्यप, सिंधू, श्रीकांतपाठाेपाठ अाता सायनाला सलग तिसऱ्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला.

पाचव्या मानांकित शिजियान वांगने ४२ मिनिटांमध्ये महिला एकेरीच्या अंतिम चारमध्ये धडक मारली. तिने २१-१५, २१-१३ ने सायनाचा पराभव केला. या सनसनाटी विजयासह तिने पुढची फेरी गाठली. या वेळी अाॅलिम्पिक पदक विजेत्या सायनाला पराभवाचा माेठा धक्का बसला. तिने विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, तिला समाधानकारक अशी कामगिरी करता अाली नाही.

वांगचा सहावा विजय
दाेन वेळच्या अाॅल इंग्लंड चॅम्पियन शिजियान वांगने सायनाविरुद्ध अापला सहावा विजय साजरा केला. अातापर्यंत या दाेन्ही अव्वल खेळाडूंमध्ये १२ सामने झाले अाहेत. त्यात दाेन्ही खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी सहा सामन्यांत विजय संपादन केला.

इंडाेनेशिया अाेपनवर नजर
गतविजेत्या सायनाला अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन स्पर्धेतील अाव्हान कायम ठेवता अाले नाही. मात्र, अाता तिला अागामी इंडाेनेशिया अाेपन बॅडमिंटन स्पर्धेत किताब जिंकण्याची संधी अाहे. तिची नजर या स्पर्धेच्या विजेतेपदावर असेल. येत्या २ जुनपासून या स्पर्धेला सुरुवात हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...