टाेकियाे - राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पी. कश्पयवर आता जपान आेपन बॅडमिंटन स्पर्धेतील पदकाची आशा टिकून आहे. जगातील नंबर वन आणि भारताची अव्वल महिला खेळाडू सायना नेहवालला गुरुवारी महिला एकेरीत अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले. याशिवाय भारताचा युवा खेळाडू के. श्रीकांतसह एचएस प्रणयलाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. भारतीय खेळाडूंसाठी स्पर्धेचा तिसरा दिवस अधिकच निराशादायी ठरला.
कश्यपची श्रीकांतवर मात
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या कश्यपने पुरुष एकेरीच्या दुसर्या फेरीत आपल्याच देशाच्या के. श्रीकांतचा पराभव केला. त्याने सरस खेळी करताना २१-११, २१-१९ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह त्याने ४५ मिनिटांत एकेरीच्या तिसर्या फेरीत धडक मारली. पराभवासह के. श्रीकांतचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता भारताच्या कश्यपला तिसर्या फेरीत चीन-तैपेईच्या चाेऊ तियेनच्या आव्हानाला सामाेरे जावे लागेल.
डाेंगविरुद्ध प्रणयचा पराभव
भारताच्या प्रणयने विजयासाठी दिलेली झंुज अपयशी ठरली. काेरियाच्या ली डाेंग केऊनविरुद्ध सामन्यात त्याला पराभवाला सामाेरे जावे लागले. बिगरमानांकित डाेंगने रंगतदार लढतीमध्ये २१-९, २१-१६ अशा फरकाने विजय मिळवला.
सायना ४० मिनिटांत पराभूत
सायना नेहवाल अवघ्या ४० मिनिटांत पराभूत झाली. बिगरमानांकित मिनात्सू मितानीने भारताच्या खेळाडूला सरळ दाेन गेममध्ये पराभूत केले. तिने २१-१३, २१-१६ अशा फरकाने राेमहर्षक विजय मिळवला. यासह तिने एकेरीची तिसरी फेरी गाठली.