आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Don\'t Want To Be A Badminton Player

सायनाला बॅडमिंटनमध्ये करिअर करायचेच नव्हते, वाचा काही रंजक फॅक्टस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले आहे. तिने संपूर्ण जगात बॅडमिंटनच्या माध्यमातून भारताचा डंका वाजवला आहे. सायनाच्या बाबतीत फार कमी लोकांना माहित असेल की, तिची बॅडमिंटनच्या क्षेत्रात करिअर करायची बिलकूल इच्छा नव्हते. मागील वर्षी एका इंटरव्हूमध्ये सायनानेच या गोष्टीचा खुलासा केला होता. तिने म्हटले होते की तिची कधीच बॅडमिंटन खेळण्याची इच्छा नव्हती. आता सायना जगातील क्रमांक 2 ची बॅडमिंटन खेळाडू आहे.
अनफिट बॉडीमुळे आली बॅडमिंटनमध्ये:
सायना नेहवालचे खरे आकर्षन बॅडमिंटन नव्हतेच, तिचे वडिल बॅडमिंटन खेळत मात्र तरीही तिला या खेळात रुची नव्हती. मुळात तिला या खेळात करीअर करायचेच नव्हते. तिचा आवडता खेळ होता कराटे! यात काही स्पर्धाही तिने जिंकल्या होत्या. मात्र कराट्यासाठी हवी तशी शरीर यष्टी न होऊशकल्याने. तिला मजबूरीने कराट्याचे स्वप्न सोडून बॅडमिंटनमध्ये यावे लागले.
बॅडमिंटन मम्मी-पप्पांचा आवडता खेळः
सायनाने सांगितले की, बॅडमिंटन हा तिच्या आई-वडिलांचा आवडता खेळ असल्याने तिने बॅडमिंटन खेळायला सुरूवत केली. आजही जास्त खेळल्यानंतर असे वाटते की, बॅडमिंटन खेळने बंद करावे. असे विचार मनात थकव्या मुळे येतात. करण बॅडमिंटन खेळण्यासाटी प्रचंड स्टॅमिना लागतो. यात साधारणपणे अर्धातास ते एक तास पळावे लागते. असे असले तरी सायना आता जगातील टॉप बॅडमिंटन खेळाडू आहे.
झाली आहे नंबर 1:
याच वर्षी मार्च महिन्यत सायना नेहवालने चीनची दादागिरी संपवत वर्ल्ड नंबर-वनचे स्थान पटकावले होते. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय शटलर ठरली आहे. यॉनॅक्स सनराइज इंडियन ओपन बॅडमिंटनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याबरोबरच तिने हे यश मिवले. सायना 2010 मध्ये वर्ल्ड नंबर वन होण्याच्या फार जवळ होती. मात्र, तिला अचानकपणे झालेल्या दुखापतीमुळे खेळण्यात व्यत्य आल्याने ती पहिल्या स्थानावर पोहचू शकली नाही.

पुढील स्लाइड्स वर पाहा, सायना नेहवालचे काही फोटोज...