आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Enters Asia Championship Quarters, PV Sindhu Falls

आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायनाची आगेकूच; सिंधूचे पॅकअप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान- जगातील माजी नंबर वन सायना नेहवालने अाशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसरीकडे जागतिक स्पर्धेतील दाेन वेळच्या कांस्यपदक विजेत्या सिंधूला पॅकअप करावे लागले. तिचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. अाता सायनाचा अंतिम अाठमधील सामना चीनच्या शिजियान वांगशी हाेणार अाहे.

अाॅलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत एकतर्फी विजयाची नाेंद केली. तिने सामन्यात थायलंडच्या निटचाेन जिंदापाेलचा पराभव केला. सायनाने २१-१४, २१-१८ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिने ४५ मिनिटांमध्ये अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. तिने दाेन्ही गेममध्ये सरस खेळी करून सहज विजय साकारला.

सिंधूची झुंज अपयशी : युवाखेळाडू सिंधूने विजयासाठी दिलेली झंुज अपयशी ठरली. तिला दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. चीन-तैपेईच्या ताई त्झु यिंगने १३-२१, २२-२०, २१-८ अशा फरकाने रंगतदार सामना जिंकला.