आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना नेहवालची सेमीफायनलमध्ये धडक; शिजियान वांगवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान- जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालने विजयाची लय कायम ठेवताना अाशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. तिने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली.

तिने सामन्यात माजी वर्ल्ड चॅॅम्पियन शिजियान वांगचा पराभव केला. सायनाने सरस खेळी करताना २१-१६, २१-१९ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला ५६ मिनिटांमध्ये अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. अाता सायनाचा उपांत्य फेरीतील सामना जपानच्या नाेझाेमी अाेकुहाराशी हाेणार अाहे.

अागामी रिआे अाॅलिम्पिक स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या सायनाने अाक्रमक खेळी केली. त्यामुळे तिला वांगविरुद्ध सामन्यात दमदार सुरुवात करता अाली. तिने ३-० ने सामन्यात अाघाडी मिळवली अाणि हीच लय कायम ठेवताना पहिला गेम जिंकला. दरम्यान, वांगने कमबॅकचा प्रयत्न केला. मात्र, तिला सायनाला राेखता अाले नाही. या वेळी पहिल्या गेममध्ये बाजी मारून सायनाने लढतीत अाघाडी घेतली. त्यानंतर तिने दुसऱ्या गेममध्येही अापली लय कायम ठेवली. मात्र, या वेळी तिला शर्थीची झुंज द्यावी लागली. वांगने सरस खेळी करताना सायनाला चाेख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा गेम अधिकच रंगतदारपणे खेळला गेला. मात्र, २१-१९ ने बाजी मारून सायनाने सामना अापल्या नावे केला.

निराशेचे वातावरण
सायनाने अंतिम अाठमधील सामना जिंकून उपांत्य फेरी गाठली. मात्र तरीही तिच्या मनावर थाेडे दडपण अाहे. कारण अातापर्यंत चार माेठ्या स्पर्धेच्या अंतिम चारमधील सामन्यात तिला पराभवाला सामाेरे जावे लागले.
बातम्या आणखी आहेत...