आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेतेपद राखण्यासाठी सायना नेहवाल सज्ज, अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन अाजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेत महिला एकेरीच्या किताबावरचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी गतविजेती सायना नेहवाल सज्ज झाली अाहे. ७५०,००० डाॅलरचे बक्षीस असलेली ही स्पर्धा अापल्या जिंकण्याचा सायनाचा पुन्हा प्रयत्न असेल.

जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेली सिंधू, पी.कश्यप, के. श्रीकांतदेखील या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. त्याच्यावरही सर्वांची नजर असेल. जागतिक चॅम्पियनशिपमधील दाेन वेळच्या कांस्यपदक विजेत्या सिंधूकडून एकेरीत जेतेपदाची अाशा अाहे. तसेच सिंधूला सलामीच्या सामन्यात जगातील माजी नंबर वन वांग ियहानच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.

श्रीकांतसमाेर हान्स
श्रीकांतला पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या हान्स क्रिस्टियनच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन पी. कश्यप अाणि सहाव्या मानांकित वांग झेंगमिंग यांच्यात सलामीचा सामना रंगणार अाहे.