आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्यांदा सायनाचा उपांत्य फेरीत पराभव , चीनची ताई त्सु विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहअालम - माजी नंबर वन सायना नेहवालला सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीतील अडसर दूर करता अाला नाही. मलेशिया अाेपनसह स्विस अाेपन इंडिया अाेपन सुपर सिरीजचा समावेश अाहे. शनिवारी सायनाचे मलेशिया अाेपन बॅडमिंटन स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिला महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले.
चीनची ताई त्सु यिंगने सेमीफायनलमध्ये सायनावर मात केली. तिने २१-१९, २१-१३ अशा फरकाने सामना जिंकला. या सनसनाटी विजयाच्या बळावर चीनच्या खेळाडूने फायनलमध्ये धडक मारली.

मंगळवारपासून सिंगापूर अाेपन
पराभवाच्या गर्तेत सापडलेली सायना सिंगापूर अाेपन बॅडमिंटन स्पर्धेत नशीब अाजमावणार अाहे. या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात हाेईल. अपयशातून सावरत सरस कामगिरी करण्याचा तिचा प्रयत्न असेल.