आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Pulls Out Of Opening Premier Badminton League

प्रीमियर बॅडमिंटन लीग : मुंबईची विजयी सलामी; सायनाचे वॉरियर्स हरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई रॉकेट्सने प्रीमिअर बॅडमिंटन लीगच्या पहिल्या सामन्यात सायना नेहवालच्या अवध वॉरियर्सला ३-० ने पराभूत करून विजयी सलामी दिली. मुंबईकडून गुरू साईदत्त, मथायस बोए आणि वल्दिमिर इव्हानोव्ह आाणि ऋत्विका गाडे यांनी विजय मिळवला. मुंबईच्या गुरू साईदत्तने पहिला गेम गमावल्यानंतरही झुंजार, कल्पक आणि चपळ खेळ करीत अवध वॉरियर्सच्या साईप्रणीतचा १५-१४, १५-१०, १५-८ असा पराभव केला.

पहिल्या गोलमध्ये २-७ असे मागे पडल्यानंतरही १४-१४ अशी बरोबरी साधून मग साईदत्तने गेम गमावला होता. मात्र, त्याने नंतरचे २ गेम अनुक्रमे १५-१०, १५-८ असे जिंकले. अवध वॉरियर्सच्या साईप्रणीतने ७-२, १४-१० अशा निर्णायक आघाडीनंतरही मुंबईच्या गुरू साईप्रणीतविरुद्धचा पहिला गेम १५-१४ असा निसटता जिंकला.

मुंबईच्या गुरू साईप्रणीतला प्रेक्षकांचा पाठिंबा तगडा होता. ८-२ अशा मोठ्या आघाडीनंतर गुरू साईदत्तला साईप्रणीतने ९-१३ असे गाठले होते. मात्र त्यानंतर नेटजवळील चुका साईप्रणीतला महागात पडल्या. गुरू साईदत्तने दुसरा गेम १५-१० असा जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. मुंबईच्या ऋत्विका गाडेने महिला एकेरीत अवध वॉरियर्सच्या वृषालीचा १५-१३, १५-१० ने पराभव केला.

मुंबईचा ‘ट्रम्प मॅच’ मध्येही विजय
‘ट्रम्प मॅच’ ही नवी संकल्पना या वेळी साकारली जात आहे. हुकमी खेळाडूंचा सामना ‘चॅलेंज’ म्हणून लावायचा आणि तो जिंकून बोनस गुण कमावायचा, अशी ही कल्पना आहे. मुंबई रॉकेट्सच्या मथायस बोए आणि वल्दिमिर इव्हानोव्ह यांना काई युन व हेंद्रा गुणवान यांनी पुरुष दुहेरीत आव्हान दिले होते. मात्र पहिला गेम त्यांनी ११-१५ असा गमावला होता. दुसरा गेम (१५-११) मुंबई रॉकेट्सने जिंकून हा ट्रम्प सामनाही पटकावला व २-० अशी आघाडी घेतली.

जल्लाेषात उद््घाटन
प्रीमियर बॅडमिंटन लीगचे माेठ्या जल्लाेषात उद््घाटन करण्यात अाले. या वेळी बॅडमिंटन महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित हाेते. तसेच लीगमध्ये सहभागी झालेल्या सहा फ्रँचायझींचे संघ अापल्या खेळाडूसमवेत साेहळ्याला हजर हाेते.