टाेकियाे - जपान आेपन बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात हाेत आहे. या स्पर्धेतील आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी जगातील नंबर वन सायना आणि सिंधू सज्ज झाल्या आहेत. या दाेन्ही महिला खेळाडू एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच केे. श्रीकांत आणि कश्यपवरही सर्वांची नजर असेल. या दाेघांकडून उल्लेखनीय कामगिरीची आशा आहे. ही स्पर्धा जपानमध्ये ८ ते १३ सप्टेंबरदरम्यान रंगणार आहे.
सायना आपल्या माेहिमेचा शुभारंभ थायलंडच्या बुसानन आेंगबुमरुंगपानविरुद्ध करणार आहे. तिला दुसरे मानांकन मिळाले आहे. सिंधूचा सलामी सामना जपानच्या मिनात्सु मितानाशी हाेणार आहे. युवा खेळाडू कश्यप, श्रीकांत, प्रणय आणि अजय जयराम यंदा पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दुसर्या फेरीवर नजर
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या दुसर्या फेरीत भारताच्या सायना नेहवाल आणि सिंधू यांच्यात काट्याची लढत हाेईल. त्यामुळे महिला एकेरीच्या दुसर्या फेरीतील लढतीवर सर्वांची नजर असेल.