आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक क्रमवारीत 'फुलराणी' सायना पुन्हा अव्वल, स्पेनच्या कॅरोलिनाला पछाडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताची फुलराणी, बॅडमिंटन क्वीन म्हणजेच सायना नेहवालने जागतिक क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा शिखर पादाक्रांत केले आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या महिला एकेरिच्या क्रमवारीत सायनाला हा मान पुन्हा एकदा प्राप्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीनकडून पराभव होऊनही सायनाने अव्वल स्थान मिळवण्याचा कारनामा केला आहे. तिलाच क्रमवारीत मागे टाकत सायनाने पहिले स्थान पटकावले. सायनाने वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात रौप्य पदक मिळवले. पण त्याआधी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचून तिने आधीच इतिहास रचला आहे. जागतिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्यापुढे मजल मारण्याचीही सायनाही ही पहिलीच वेळ होती.