आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal Seals Semifinal Spot, PV Sindhu Sinks At Malaysia Open

मलेशिया अाेपन बॅडमिंटन: सायना उपांत्य फेरीत; सिंधूचे अाव्हान संपुष्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाह अालम - जागतिक क्रमवारीत अाठव्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालने पाडव्याचा गाेडवा कायम ठेवताना मलेशिया अाेपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे जागतिक स्पर्धेतील दाेन वेळची कांस्यपदक विजेत्या सिंधूचे पराभवाने अाव्हान संपुष्टात अाले. त्यामुळे तिला पॅकअप करावे लागले.

माजी नंबर वन सायना नेहवालने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या पाेर्नटिप बुरानप्रसेत्सुकचा पराभव केला. तिने १९-२१, २१-१४, २१-१४ ने विजय मिळवला. यासाठी तिने ५८ मिनिटे शर्थीची झंुज दिली. पहिल्या गेममधील अपयशातून सावरलेल्या सायनाने दुसऱ्या व तिसऱ्या निर्णायक गेममध्ये सरस खेळी करून विजयश्री खेचून अाणला. सायनाचा थायलंडच्या खेळाडूविरुद्धचा हा अातापर्यंंतचा सातवा विजय ठरला.
सिंधू २९ मिनिटांत झाली पराभूत
भारताची युवा खेळाडू पी. व्ही. सिंधूला अवघ्या २९ मिनिटांत स्पर्धेतील अापला गाशा गुंडाळावा लागला. तिला जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या रत्नाचाेकने धूळ चारली. तिने २१-७, २१-८ अशा फरकाने सामना जिंकला. यासह तिला उपांत्य फेरीत प्रवेश करता अाला.