आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal's Awadhe Warriors Register Convincing Win Over Delhi Aces

सायनाच्या वॉरियर्सची दिल्ली एसर्सवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऑलिम्पिक पदक विजेत्या सायना नेहवालचा अवध वाॅरियर्स संघ पहिल्या सत्राच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) विजयी ट्रॅकवर अाला अाहे. या टीमने साेमवारी दिल्ली एसर्सचा पराभव केला. अवध वाॅरियर्सने रंगतदार लढतीत ४-३ अशा फरकाने शानदार विजयाची नाेंद केली. यासह वाॅरियर्सला लीगमध्ये पहिल्या विजय मिळवता अाला. यापूर्वी सलामीला वाॅरियर्सचा पराभव झाला हाेता.

सायनाने महिला एकेरीत दिल्लीच्या पी. सी. तुलसीचा १५-९, १५-१० ने पराभव केला. त्यानंतर पुरुष एकेरीत साईप्रणीतने दिल्लीच्या राजीव अाेसेफचा १५-१२, १५-९ ने अशा फरकाने पराभव केला.

मुंबई संघाला दणका : पाहुण्या चेन्नई स्मॅशर्सने पहिल्या सत्राच्या पीबीएलमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. चेन्नई टीमने सामन्यात यजमान मुंबई राॅकेट्सचा पराभव केला. चेन्नईने ४-३ अशा फरकाने सामना जिंकला. यासह यजमान टीमला अापल्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला.

सायमन सांताेसाेने ट्रॅम्प लढतीत अारएमव्ही गुरुसाईदत्तला पराभूत केले. यासह त्याने चेन्नईचा विजय निश्चित केला. तत्पूर्वी मिश्र दुहेरीच्या लढतीत चेन्नईच्या पिया जेबाइदाह व क्रिस एडकाॅकने यजमान मुंबईच्या कॅमिला-ब्लादिमीर इवानाेवचा १५-१०, ७-१५, १५-११ ने पराभव केला. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने मुंबईच्या हान लीवर १५-८, १५-११, १५-८ ने मात केली.

मुंबई - बंगळुरू अाज लढत : पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या मुंबई राॅकेट्स अाणि बंगळुरू टाॅप गन्स यांच्यात मंगळवारी सामना रंगणार अाहे.