आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंधू उपांत्य फेरीत; सायना नेहवाल बाहेर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेऊवू - चीन अाेपन चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने अापली विजयी माेहीम अबाधित ठेवताना हाँगकाँग अाेपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे लंडन अाॅलिम्पिकमधील पदक विजेत्या सायना नेहवालला पॅकअप करावे लागले. अंतिम अाठमधील पराभवामुळे तिचे अाव्हान संपुष्टात अाले. अाता भारताची मदार सिंधूवर असेल. अजय जयराम अाणि समीर वर्मानेही पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली.

सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात सिंगापूरच्या लियांग जियायूवर मात केली. तिने २१-१७, २१-२३, २१-१८ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह तिला एकेरीच्या अंतिम चारमधील अापला प्रवेश निश्चित करता अाला. याशिवाय सिंधूने अापल्या करिअरमध्ये सिंगापूरच्या लियांगविरुद्धचे अापले वर्चस्व कायम ठेवले. तिचा लियांगविरुद्धचा हा सलग दुसरा विजय ठरला. अातापर्यंत दाेन वेळा या दाेन्ही खेळाडू समाेरासमाेर अाल्या. या दाेन्ही सामन्यांत भारताची सिंधू विजय ठरली.

पुढे वाचा...जयराम ३२ मिनिटांत उपांत्य फेरीत
बातम्या आणखी आहेत...