आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांनंतर स्पर्धेत सहभाग; सायनाने गाठली उपांत्य फेरी; सीनियर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- अाॅलिम्पिक अाणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पदक विजेत्या सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधूने साेमवारी शानदार विजय संपादन करून ८२ वी राष्ट्रीय सीनियर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेच्या पुढची फेरीत धडक मारली. दहा वर्षानंतर सायनाने या स्पर्धेत सहभाग घेतला. तिने सलग दाेन विजय संपादन करून थेट महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी २००७ मध्ये ती या स्पर्धेत सहभागी झाली हाेती.  दुसरीकडे युवा खेळाडूंनी विजयासाठी दिलेली झंुज अपयशी ठरली. अांतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना थेट प्री-क्वार्टर फायनलमध्ये एंट्री देण्यात अाली.   
रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या सिंधूने उपांंत्यपूर्व सामन्यात श्रेयंशी परदेशीवर २१-११, २१-१७ ने मात केली. यासह तिने उपांंत्य फेरीत प्रवेश केला. यापूूर्वी तिने  प्री-क्वार्टर फायनलमध्ये रेवती देवस्थळेला पराभूत केले. तिने २१-१६, २१-२ अशा फरकाने सहज विजय मिळवला. यासह तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली. दरम्यान, युवा रेवतीला पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मात्र, या वेळी अापल्याला या माेठ्या खेळाडूविरुद्ध सामना खेळताना अालेला अनुभव माेलाचा असल्याची प्रतिक्रिया रेवतीने दिली. तिने पहिल्या गेममध्ये शानदार प्रत्युत्तराची खेळी केली. मात्र, त्यानंतर तिला दुसऱ्या गेममध्ये प्रत्युत्तराची फारशी संधीच मिळाली नाही. सिंधूने अाक्रमक खेळी करताना वेगाने गुणाची कमाई केली अाणि सामना जिंकला. यासह तिने पुढच्या फेरी गाठली. 

श्रीकांतकडून टंडनचा पराभव : सत्रात चार सुपर सिरीज किताब विजेत्या के. श्रीकांतनेही  राष्ट्रीय स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. त्याने पुरुष एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये ार्यमॅन टंडनचा पराभव केला. त्याने २१-१४, २१-१३ अशा फरकाने सामना जिंकला.  
 
एच.एस. प्रणयचा राेमहर्षक विजय  
पुरुष एकेरीच्या अंतिम १६ मध्ये अांतरराष्ट्रीय खेळाडू एच.एस. प्रणय विजयी ठरला. त्याने सामन्यात अापल्याच देशाच्या चिराग सेनवर राेमहर्षक विजय संपादन केला. त्याने २१-७, २०-२२, २१-१५ अशा फरकाने सामना जिंकला. यासाठी त्याला तीन गेमपर्यंत झुंज द्यावी लागली. त्याने दमदार सुरुवात करताना पहिला गेम सहज जिंकला. मात्र, पिछाडीवर पडलेल्या चिरागने दुसऱ्या गेममध्ये बाजी मारली अाणि प्रणयला बराेबरीत राेखले. मात्र,  त्याचा तिसऱ्या गेममधील प्रयत्न अपुरा ठरला. प्रणयने  निर्णायक गेम जिंकला व सामना अापल्या नावे केला.   
 
सायनाची कश्यपवर मात; २१-१७, २१-१० ने विजयंी 
माजी नंबर वन अाणि राष्ट्रीय चॅम्पियन सायना नेहवालने महिला एकेरीच्या अंतिम ८ च्या सामन्यात अाकर्षि कश्यपचा पराभव केला. तिने २१-१७, २१-१० अश फरकाने विजय मिळवला. यासह तिने उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी तिने  अंतिम १६ मध्ये युवा खेळाडू वृषालीचा पराभव केला. तिने २१-१२, २१-१० अशा फरकाने एकतर्फी विजय संपादन केला. यासह तिने अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. तिने दाेन्ही गेमवर अाक्रमक खेळी करताना सहज विजय संपादन केला. दरम्यान, वृषालीने सामन्यात विजयासाठी जाेरदार झंुज दिली. मात्र, तिचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यामुळे तिला पराभवाला सामाेरे जावे लागले.
बातम्या आणखी आहेत...