आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलिया ओपन बॅडमिंटन : सायना, श्रीकांत विजयी; सिंधू, कश्यपला धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळेसची कांस्यपदक विजेती भारताची पी.व्ही. सिंधू आणि कॉमनवेल्थ गेम्सचा सुवर्णपदक विजेता परुपल्ली कश्यप यांचा बुधवारी पराभव झाला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत ते स्पर्धेबाहेर झाले आहेत.
दुसरीकडे चौथा मानांकित के. श्रीकांतने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू आणि स्पर्धेतील दुसरी मानांकित सायना नेहवालनेही विजय मिळवला. सायनाने मलेशियाच्या चीह लिडिया यि यू हिला ३२ मिनिटांत २१-१२, २१-१० ने हरवले.

पुरुष एकेरीत जगातील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आणि चौथा मानांकित श्रीकांतने १४ वा मानांकित डेन्मार्कच्या हँस क्रिस्टियन विटिंगहसला ५३ मिनिटांत १४-२१, २१-८, २२-२० ने हरवले. सिंधूला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत आठवी मानांकित चीनच्या वांग यिहानने एक तास १२ मिनिटांच्या संघर्षानंतर २१-१५, १५-२१, २३-२५ ने हरवले. सहावा मानांकित चीनच्या वांग झेनमिंगने एक तास आणि २१ मिनिटांच्या संघर्षानंतर भारताच्या पी. कश्यपचा २६-२४, १८-२१, २०-२२ ने पराभव झाला.

ज्वाला-पोनप्पा विजयी
महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी हॉलंडची समांथा बर्निंग आणि इंस टेबलिंग या जोडीला सरळ गेममध्ये २१-१३, २१-१३ ने २९ मिनिटांत पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत प्रणव जैरी चोपडा आणि अश्विनी पोनप्पाचा पराभव झाला. प्रणव-पोनप्पा यांना कोरियन जोडी चोई सोलगिन आणि इयोन यी वन जोडीने ३५ मिनिटांत २१-१९, २१-१४ ने पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
बातम्या आणखी आहेत...