आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना, सिंधू, अजय जयराम विजयी, स्विस ओपन बॅडमिंटन; प्रणयची विजयी सलामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बासेल - जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली सायना नेहवाल, सिंधू, अजय जयराम, बी. साई प्रणीत समीर वर्माने स्विस अाेपन ग्रँडप्रिक्स गाेल्ड बॅडमिंटन स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. यासह भारताच्या या सर्व खेळाडूंनी अापापल्या गटाची दुसरी फेरी गाठली.
मलेशिया अाेपनमध्ये जगातील नंबर वन ली चाेंग वेईला धूळ चारणाऱ्या बी. साई प्रणीतने अाता सलामीला स्विसच्या मॅथिस बाेनीचा २१-१४, १३-२१, २१-६ ने पराभव केला. जयरामने सलामीच्या सामन्यात जियान शिराग चिअांगवर २१-८, २१-१७ ने मात केली. प्रणयने पहिल्या फेरीत फिनलंडच्या कल्ले काेलजाेनचा २१-१९, २१-१९ ने पराभव केला. समीर वर्माने डेन्मार्कच्या एमिल हाेलस्टला २१-१७, २४-२२ ने हरवले.
सायनाची ३३ मिनिटांत करीनवर २-० ने मात
दाेन वेळची चॅम्पियन सायनाने अवघ्या ३३ मिनिटांत सलामीचा सामना जिंकला. तिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या करीन स्चानासेला २१-७, २१-१५ ने पराभूत केले. यासह तिने दुसऱ्या फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला.
बातम्या आणखी आहेत...