आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सायना, सिंधू दुसऱ्या फेरीत; कश्यपचा पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलून- भारताची स्टार खेळाडू, लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवालने संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. चार लाख डॉलर बक्षीस असलेल्या स्पर्धेत सायनाने जागतिक क्रमवारीत ४४ व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या की मेट्टे पोलसेनला २१-१९, २३-२१ ने हरवले. आता जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेल्या सायनाचा सामना आठव्या मानांकित चीनच्या चेन युफेईविरुद्ध होईल.


दुसरीकडे पी. व्ही. सिंधूने दुसऱ्या मानांकित हाँगकाँगच्या लेंग युट ई हिला २१-१८, २१-१० पराभूत केले. आता  तिचा पुढील सामना जापानच्या ओहरी व रशियाच्या इग्निया यांच्यातील विजेत्याशी होईल. पुरुष एकेरीत प्रणयने हाँगकाँगच्या हु युन याला १९-२१,२१-१७, २१-१५ ने हरवले. त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. सात्विकसेराज रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा या जोडीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या भारतीय जोडी इंडोनेशियाच्या हाफिज फैजल आणि ग्लोरिया एमानुएल विदजाजा जोडीकडून १८-२१, ११-२१ ने हरली.  


कश्यप वर्मा अपयशी 
पारुपल्ली कश्यप आणि सौरभ वर्मा हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडले. कश्यपला कोरियाच्या ली डोंग कियूनकडून १५-२१, २१-९, २२-२० ने पराभव स्वीकारावा लागला. वर्माला इंडोनिशियाच्या टोमी सुगियार्तोकडून १५-२१, ८-२१ ने मात खावी लागली.  

बातम्या आणखी आहेत...