आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन : सायनाची माेहीम अाजपासून; अश्विनी, गुरुसाई विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - अाॅस्ट्रेलियन अाेपन बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत जगातील नंबर वन सायना नेहवालला महिला एकेरीच्या किताबाची प्रबळ दावेदार मानले जात अाहे. ती अापल्या किताबाच्या माेहिमेला बुधवापासून दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली.
सिडनी अाॅलिम्पिक पार्कमध्ये सायना महिला एकेरीच्या सलामी सामन्यात क्वालीफायर चीयह ल्याडीया यीविरुद्ध खेळणार अाहे. तसेच सिंधू ,कश्यप, के. श्रीकांत यांच्यावरही सर्वाची नजर असेल. महिला एकेरीत सिंधूचा सामना जगातील माजी नंबर वन यिहानशी हाेणार अाहे. या सामन्यातील विजयासह सिंधूला स्पर्धेत दमदार सुरुवात करता येईल. मात्र, यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार अाहे. त्यामुळे तिला स्पर्धेतील जेतेपदाच्या मार्गातील सर्वात माेठा अडथळा दुर करता येणार अाहे. गत काही दिवसांपासून जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या सिंधूला समाधानकारक अशी कामगिरी साधता अाली नाही. मात्र, अाॅस्ट्रेलियन अाेपनमध्ये चमत्कार करण्याचा तिचा प्रयत्न असणार अाहेे.

युवा खेळाडूंचा विजय
पात्रता फेरीत भारताच्या युवा खेळाडूंनी शानदार विजयाची नाेंद केली. यात प्रणव चाेप्रा व अश्विन पाेनप्पा, अार.एम.व्ही. गुरुसाई दत्तचा समावेश अाहे. राष्ट्रकुल स्पर्धेचे पदक विजेत्या अश्विनीने मिश्र दुहेरीत चोप्रासाेबत शानदार विजयाची नाेंद केली. या जाेडीने अवघ्या १९ मिनिटांत सामना जिंकला. या जाेडीने पहिल्या फेरीत अाॅस्ट्रेलियाच्या चाम चेन व सुसान वांगचा पराभव केला. त्यांनी २१-४, २१-६ ने विजय मिळवला. त्यानंतर भारताच्या जाेडीने दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या मार्क लाम्सफस अाणि इसाबेल हेरिट्रिचवर २१-१९, २१-७ ने मात केली.
बातम्या आणखी आहेत...