आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sakshi Chitlange Earns Silver Medal In Commonwealth Chess Championship

कॉमनवेल्थ बुद्धिबळ चॅम्पियनशिप सबज्युनिअर गटात साक्षी चितलांगेला रौप्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नवी दिल्ली येथे झालेल्या कॉमनवेल्थ बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०१५ या स्पर्धेत औरंगाबादची युवा खेळाडू साक्षी दिनेश चितलांगे हिने रौप्यपदक पटकावले. तिने मुलींच्या १६ वर्षांखालील गटात ८ पैकी ६ गुण घेत ही कामगिरी साधली.
स्पर्धेत पहिल्या डावात शार्वी गोयल हिचा क्वीन पान ओपेनिंगने सुरू झालेल्या खेळीत मध्य डावात आक्रमक खेळ करीत पराभव केला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या मार्क इंगचा १ प्यादा जिंकूनही साक्षीला बरोबरीत समाधान मानावे लागले, तर तिसऱ्या डावात संयुक्ता सीचा पराभव केला. चौथ्या फेरीत मेघना सीएच सोबत ४.५ तास चाललेल्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या पर्वात मेघनाला चूक करावयास भाग पाडत विजय मिळवला. पाचव्या फेरीत साक्षीला आकांक्षा हगवणेकडून अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. सहाव्या फेरीत साक्षीने सलोनी सापळे हिचा फ्रेंच डिफेन्सनी सुरू झालेल्या डावात सहज पराभव केला. सातव्या डावात धनश्री राठीला पराभूत केले व शेवटच्या फेरीत रागा ज्योत्स्नासोबत बरोबरी करत रौप्यपदक मिळवले. तिचे जिल्हा क्रीडाधिकारी ऊर्मिला मोराळे, संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर सावे, सचिव हेमेंद्र पटेल यांनी अभिनंदन केले.
देशाला पदक देणार
^देशासाठी पदक मिळवण्यात एक वेगळाच आनंद असतो. सलग तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवल्याबद्दल मी समाधानी आहे. असेच प्रदर्शन कायम ठेवत यापुढेही देशासाठी सतत चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न राहिल.
साक्षी चितलांगे