आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिपटलावरच्या ‘तेजा’ला साेनेरी यशाची ‘साक्ष’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- बुद्धिपटलावरची क्वीन साक्षी चितलांगेने रविवारी अासियान बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये महिला अांतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान पटकावला. अाैरंगाबादची १५ वर्षीय साक्षी ही अांतरराष्ट्रीय मास्टरची पदवी पटकावणारी देशातील पहिली महिला बुद्धिबळपटू ठरली. तिने १८ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात फिलिपाइन्सच्या विन्सेट व्हीनसचा पराभव केला. यासह तिने या गटात सुवर्णपदकावर नाव काेरले.

या स्पर्धेत साक्षीने एकूण सात गुणांसह अव्वलस्थानावर धडक मारली. तिने फायनलमध्ये सरस चाली करून अापला विजय निश्चित केला. एकूण नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत साक्षीने पाच लढतीत विजयाची नाेंद केली. तसेच तिने चार लढतीमध्ये प्रतिस्पर्धीला बराेबरीत राेखले.

अाैरंगाबादचे गाेल्डन यश :
सुवर्णपदक पटकावून साक्षीने अाैरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला. याशिवाय अाैरंगाबादसाठी हे साेनेरी ठरले. अांतरराष्ट्रीय मास्टरचा बहुमान पटकावणारी साक्षी ही अाैरंगाबादची पहिली बुद्धिबळपटू ठरली. या साेेनेरी यशाबद्दल तिचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माेरेश्वर सावे, उपाध्यक्ष किशाेर लव्हेकर, परमेश्वर बनसाेडे, सचिव हेमेंद्र पटेल यांनी अभिनंदन केले.

तेजस्विनीला पहिला नाॅर्म
जागतिक स्पर्धेतील चॅम्पियन तेजस्विनी सागरने अांतरराष्ट्रीय स्तरावर तेज कायम ठेवले. तिने असियान स्पर्धेत दाेन राैप्य मिळवले. याशिवाय तेजस्विनीने पहिला अांतरराष्ट्रीय नाॅर्म संपादन केला. १५ वर्षीय तेजस्विनीने स्पर्धेच्या २० वर्षांखालील गटात नशीब अाजमावले व दाेन राैप्यपदक जिंकले. तिने वैयक्तिक अाणि सांघिक गटात राैप्यपदकाची कमाई केली.