आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राँझ विजेत्या साक्षीला घाेषित केलेले ५० लाखांचे बक्षीस महाराष्ट्राने अद्याप दिलेच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - िरओ अाॅलिम्पिकमध्ये पदके अाणणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, कुस्तीपटू साक्षी मलिकला महाराष्ट्र सरकारने क्रमश: ७५ व ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले. िसंधूला एका कार्यक्रमात ७५ लाखांचे हे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात अाले. अाम्ही त्या दिवशी मुंबईतच हाेताे; मात्र अाम्हाला साधी विचारणाही झाली नाही, अशी प्रतिक्रिया साक्षी मलिकची अाई सुदेश मलिक यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

रियाे अाॅलिम्पिकमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल पदक विजेत्यांना अाणि त्यांच्या प्रशिक्षकांवरती विविध राज्यांतून लाखाे-काेटींच्या बक्षिसांचा पाऊस पडायला लागला. त्यात महाराष्ट्रही मागे नव्हते. महाराष्ट्र सरकारने सिंधूला ७५ लाख, ितचे प्रशिक्षक गाेपीचंद यांना २५ लाख, साक्षी मलिक िहला ५० लाख रुपये घाेषित केले. सप्टेंबरच्या पहिल्याच अाठवड्यात मुंबई येथे बॅडमिंटन असाेसिएशनतर्फे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि क्रीडामंत्री िवनाेद तावडे यांच्या हस्ते िसंधू व पी. गाेपीचंद यांना घाेषित बक्षीस देऊन सन्मानित करण्यात अाले. याच दिवशी साक्षी अाणि ितचे अाई-वडील मुंबईत हाेते. साक्षीची अाई म्हणाली, सिंधूला सन्मानित करताना साक्षीलाही बाेलावले जाईल असे वाटले हाेते, परंतु काेणी साधी िवचारणाही केली नाही. दाेन महिने हाेऊनही महाराष्ट्र सरकारकडून काेणताही अधिकृत निराेप अाला नाही.

यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता क्रीडामंत्री िवनाेद तावडे िकंवा त्यांचे कार्यालय याबाबत माहिती देऊ शकेल, असे सांगण्यात अाले. तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बैठकीत असल्याचा निराेप मिळाला. मात्र, त्यांचे माध्यम समन्वयक गाेविंद येतायेकर यांनी तावडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तावडे यांच्या मते, खेळाडूंना घाेषित झालेली रक्कम ही पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करावी लागणार अाहे. क्रीडा िवभागाकडून प्रक्रिया झाली आहे, अाता िवत्त िवभागाकडे हा विषय अाहे. हा निधी मंजूर झाला की क्रीडापटूंना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

सिंधूला आधी मिळाले बक्षीस
सिंधूला राज्य शासनाकडून आधीच बक्षीस देण्यात आले. त्यावेळी साक्षीला काही दिले नाही, याचे समाधानकारक उत्तर शासनाकडे नाही. बॅडमिंटन असाेसिएशनतर्फे कार्यक्रम अायााेजित हाेता. त्यात मुख्यमंत्री व मी दाेघेही हजर राहणार हाेताे. त्यात सिंधू अाणि गाेपीचंद यांचा सन्मान करणे यथाेचित हाेते, असे उत्तर क्रीडामंत्री तावडे यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...