आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Sakshi Malik Expresses Desire To Meet Virender Sehwag – Read Viru\'s HILARIOUS Reply

वीरेंद्र सेहवागची साक्षी मलिकने घेतली भेट, सेहवागच्या घरी घेतला पाहुणचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी मलिकने अखेर सेहवागच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. - Divya Marathi
साक्षी मलिकने अखेर सेहवागच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली.
स्पोर्टस डेस्क- भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग सध्या ट्विटरवरुन करीत असलेल्या पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आहे. शोभा डे, इंग्लिश पत्रकार मोर्गन यांना आपल्या 'वीरू' स्टाईलमध्ये उत्तर दिल्यानंतर आता रिओत ऑलिंपिक ब्राँझ विजेती साक्षी मलिकच्या ट्विटलाही वीरुने आपल्या अंदाजात रिप्लाय दिला.
त्याचे झाले असे की, ब्राँझ विजेती साक्षी मलिक बुधवारी परत आली. बुधवारी स्वागत समारंभ व मिरवणूकीत दिवस गेल्यानंतर गुरुवारी ती रोहतकमधील मोखरा या आपल्या गावात कुटुंबियांसमवेत होती. यानंतर साक्षीने गुरुवारी रात्री भारताचा धडाकेबाज फलंदाज राहिलेल्या वीरेंद्र सेहवागला एक टि्वट केले. “गुड मॉर्निंग सर, मला तुम्हाला भेटायचे आहे. प्लीज, तुम्ही मला वेळ कळवा. आज किंवा उद्या भेटणं शक्य होईल काय?”, असे ट्विट साक्षीने सेहवागला करीत भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर वीरेंद्र मिस्कील टिप्पणी करण्यात पटाईत असलेल्या सेहवागने साक्षीचा ट्वीट कोट करुन आपल्या स्टाईलमध्येच उत्तर दिले. सेहवागने साक्षीला उत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, “नक्कीच साक्षी. मी तुला भेटीची वेळ कळवेन. पण मी आशा करतो की, आपल्या भेटीनंतर तू माझ्यासोबत कुस्ती सुरु करणार नाहीस?.” सेहवाग नेहमीच तरूण खेळाडूंना प्रेरणा देण्याचे काम करतो. त्यामुळेच साक्षीने त्याला भेटण्याची इच्छा प्रकट केली आहे. अखेर सेहवागने साक्षीला वेळ दिली व या दोघांची भेटही झाली. दोघांनी या भेटीबाबत आनंद व्यक्त केला. सेहवागच्या घरी साक्षीचा पाहुणचार करण्यात आला.
पुढे स्लाईडद्वारे पाहा व वाचा, साक्षी मलिकचे टि्वट आणि त्याला उत्तर दिलेले सेहवागचे टि्वट....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...