आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी: बरोबरीची खेळाडू असेल तर दगाबाजी, अंतर १०-२० असेल तर दगाबाजी कोण करेल?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक रविवारी ग्वाल्हेरला  आयटीएफ फ्युचर वुमेन्स इंटरनॅशनल टेनिस चॅम्पियनशिपच्या उद्घाटनासाठी आली होती. त्याच वेळी मध्य प्रदेशची नंबर वन कुस्तीपटू राणी राणा सुद्धा शहरात होती. राणीने ‘दिव्य मराठी’ साठी साक्षीची मुलाखत घेतली.   
दोघींतील चर्चा अशी रंगली...
  
} राणी : तू पदक जिंकल्यानंतर अनेक आई-वडील आपल्या मुलीला कुस्तीपटू बनवण्यास तयार झालेत ?  
} साक्षी : हो. रिओ ऑलिम्पिकनंतर देशात कुस्तीसाठी वातावरण तयार झाले आहे. आधी बॅडमिंटन, नेमबाज आणि टेनिसवर फोकस होते. आता मुलीसुद्धा कुस्तीत येऊ लागल्या आहेत.   
 
} राणी : महिला कुस्तीचा दर्जा सुधारण्यासाठी काय करणे गरजेचे आहे ?  
} साक्षी : शाळेपासून मुलांना प्रशिक्षण दिले तर देशात अनेक महिला कुस्तीपटू घडतील.  
} राणी : माझ्यासह दगाबाजी झाली आहे...  
} साक्षी : बेइमानी, दगाबाजी बरोबरीचा खेळाडू असताना होते. माझा फॉर्म्युला वेगळा आहे..१०-२० चे अंतर. स्वत:ला इतके शक्तीशाली बनायवायचे की दगाबाजी करणाऱ्याला संधीच नसली पाहिजे.   
 
} राणी : दुखापतींबाबत काय करतेस ?  
} साक्षी : २०१४ मध्ये माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती.  त्या वेळी मी रिओची तयारी करत होती. नंतर मी या भिंतीला पळवण्यासाठी स्वत:ला मजबूत केले. मी दुरुस्त झाली. मात्र, तो काळ विसरले नाही.  
 
} राणी : खेळाबाबत हरियाणा शासनाचीच भूमिका कशी ? सकारात्मक आहे काय  ?  
} साक्षी : हरियाणात राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरचा पदक विजेता होताच शासनाकडून पैसे आणि सन्मान दोन्ही मिळते. मात्र, इतर राज्यातील अनेक खेळाडूंशी बोलताना लक्षात येते की त्यांच्याकडे याबाबत कसलेच धोरण नाही. अशा स्थितीत खेळाडू प्रेरित तरी कसा होणार ? 

राणी : तू पदक जिंकले तेव्हा महिलासुद्धा खूप काही करू शकतात, असे वाटू लागले ?  
साक्षी :  आपल्या देशातून आणखी एक महिला खेळाडू पदक जिंकेल, तेव्हा खरा आनंद होईल.
 
बातम्या आणखी आहेत...