आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साक्षीचे वडील म्हणाले : मुलींना कुस्ती खेळणे शोभत नाही, असे कुणीही म्हणू शकणार नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोक्यात फक्त दोनच प्रश्न होते... हरले तर काय होईल व जिंकले तर काय मिळेल. त्याशिवाय काहीच नव्हते, असे साक्षी सांगते. तिकडे, हरियाणाच्या मोखरा गावात तिचे वडील म्हणाले, कुस्ती खेळणे मुलींना शोभत नाहीत, असे आता कुणी म्हणू शकणार नाही.
कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारी मी देशाची पहिली महिला ठरली आहे, याचा अभिमान आहे,’ अशी भावनिक प्रतिक्रिया रिओत कांस्यपदक जिंकणारी भारतीय महिला मल्ल साक्षी मलिकने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. रिओत हजर असलेल्या ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने साक्षीची घेतलेली ही खास मुलाखत.

- हा विजय सेलिब्रेट कसा करणार?
साक्षी : कोणत्याही गोष्टीचा जाहीर आनंद व्यक्त करणे, आरडाओरड करून आनंद साजरा करणे हा माझा स्वभाव नाही. मला शांतता आवडते. त्यामुळे पार्टी वगैरे असा विचारही केला नाही, जे काही घरगुती वातावरणात सर्वांच्या समवेत साजरे होईल त्यात आनंद मानायचा, एवढेच ठरविले आहे.

- सर्वप्रथम पदक कुणाला दाखवणार?
साक्षी : मी जेव्हा घरी जाईन, तेव्हा सर्वच जण एकदम मला सामोरे येतील. जो कुणी पुढे असेल त्याला प्रथम पदक दाखवेन. लहानपणी वडील मला सांगायचे, तुला विमानात बसायचे असेल तर खेळात असे काहीतरी कर की, तुझे नाव चर्चेत येईल. ते एक आकर्षण होते. कुस्तीमध्ये फोगाट भगिनींचे नाव मोठे आहे. बल्गेरियन कॅम्पला गेले, तेव्हा रांगेत साऱ्या फोगाट भगिनी, त्यामध्ये मी एकटीच आडनाव फोगाट नसलेली होती. हळूहळू याची सवय झाली. माझी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली. मघाशी म्हटले त्याप्रमाणे, मी नेहमी दोन बाजूंचा विचार करते. हरले तर काय? आणि जिंकले तर काय?

- आता जिंकल्यानंतर काय?
साक्षी : माझं सारं आयुष्यच आता बदलून जाणार आहे. घरी गेल्यानंतर आराम करायचा आहे. पण मला ठाऊक आहे, तशी संधी मिळणार नाही. कारण घरातल्यांना कितीही सांगितले तरीही मुलाखती घेणारे आले की, आई उठवायला येणारच. या अनुभवातूनही जायला आवडेल. देशासाठी काहीतरी केल्याचे समाधान आहे. अनुभव शेअर करायला आवडतील.

- सोशल मीडियावर तू आहेस का? फेसबुक, व्हॉट्सअॅप पाहतेस का?
साक्षी : माझे फेसबुकवर पेज आहे, पण मी आजवर ते पाहिलेले नाही. माझा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ सचिन याने ते पेज बनविले आहे. तोच त्यावर फोटो टाकत असतो. मला वाटतं आतापर्यंत येथील फोटो त्याने टाकलेही असतील. भावाने मला सांगितले होते, मला रक्षाबंधनाला राखी नको ऑलिम्पिक पदक हवे आहे. भावाची इच्छा पूर्ण झाली.

- तू काय खाणे पसंत करतेस ?
साक्षी : मी शाकाहारी खाणे पसंत करते. कधी तरी चिकन, अंडे खाते, मात्र माझे आवडते खाणे आहे पराठे, लोणचे, दही. मात्र स्पर्धा असताना या आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मला संगीताचा किंवा चित्रपट पाहण्याचा फारसा शौक नाही. कधी कधी कंटाळा आला तर हेडफोन लावून गाणे ऐकत बसते. मात्र ‘शोर शराबा’ आवडत नाही. मी शांतताप्रिय आहे.

पुढे वाचा, साक्षीच्या विजयाने हा बोध मिळतो...
बातम्या आणखी आहेत...