आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#Rio: भारताला पहिले मेडल, साक्षीला हरियाणाकडून 2.5 कोटी, रेल्वेने दिले पदोन्नतीचे बक्षिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जेनेरियो - ऑलिम्पिकच्या 12 व्या दिवशी 23 वर्षांची रेसलर साक्षी मलिकने कमालीचा खेळ केला 58 किलो वजन गटात फ्रीस्टाइल रेसलिंगमध्ये सुरुवातीला ती 5-0 ने पिछाडीवर होती. मात्र उत्तरार्धात प्रथम 4 गुण त्यानंतर 1 गुण मिळवत बरोबरी साधली. सामन्या संपण्यास 10 सेकंद शिल्लक असतांना 3 गुणांची कमाई करत साक्षीने कांस्यपदकावर नाव कोरले. हरियाणा सरकारने रोहतकच्या कन्येला 2.5 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. रेल्वेनेही साक्षीला पदोन्नती जाहीर केली आहे.

साक्षी बुधवारी सायंकाळी 6:38 वाजेपासून उशिरा रात्री 2:50 पर्यंत आठ तास 12 मिनिटांमध्ये 5 सामन्यांमध्ये लढली. चार मध्ये यशश्री मिळवत तिने देशाला मेडल मिळवून दिले. रोहतकमध्ये तिच्या वडिलांनी भास्करला सांगितले, की फक्त ड्रेससाठी रेसलिंग सुरु करणारी साक्षी एवढेमोठे यश मिळवेल याची कल्पनाही केली नव्हती.

नेते-अभिनेत्यांकडून अभिनंदन, बक्षिसांचा वर्षाव
- साक्षीच्या विजयाने संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. विविध खेळातील दिग्गजांसोबत राजकीय नेते आणि अभिनेत्यांनी सोशल मीडियावरुन तिचे अभिनंदन केले आहे.
- अभिनंदनाच्या वर्षावासोबतच साक्षीवर बक्षिसांचा पाऊस पडत आहे. हरियाणा सरकारने साक्षीला अडीच कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
- रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपिक असणारी साक्षीला रेल्वेन बढतीचे बक्षिस दिले आहे.
रेसलिंगमध्ये पहिले, महिलांमध्ये भारताला चौथे मेडल
- साक्षी ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी चौथी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
- याआधी 2000 मध्ये कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टिंगमध्ये कांन्स पदक जिंकले होते.
- 2012 मध्ये मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये कांन्स पदकावर नाव कोरले होते.
- त्याचवर्षी (2012) सायना नेहवालने बॅडमेंटनमध्ये कांन्स पदक जिंकले होते.
- रेसलिंगमध्ये एखाद्या भारतीय महिलेने जिंकलेले हे पहिले पदक आहे.
ड्रेससाठी कुस्ती खेळायला सुरुवात
साक्षीचे वडील सुखबीर मलिक म्हणाले, 'काही वर्षांपूर्वी फक्त नवा ड्रेस मिळेल यासाठी कुस्ती खेळणारी साक्षी एवढी मोठी उंची गाठेल असा कधी विचारही केला नव्हता. साक्षीने फार लहान असतान सब ज्यूनियर एशियन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकले होते. कॉमनवेल्थमध्ये तिने सिल्व्हर मेडल जिंकले होते.'
- ते म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. तिने देशाला मेडल जिंकवून दिल्यामुळे तिचा अभिमान वाटतो.
- साक्षीचे मोखरा गावापासून रोहतक सेक्टर 3 पर्यंत रॅली काढून स्वागत केले जाईल.

पंतप्रधान म्हणाले - देशाला सन्मानित केले
- क्रिकेटर अनिल कुंबळे, राज्यवर्धन राठोड, गगन नारंग, योगेश्वर दत्त, सुशील कुमार, ज्वाला गुट्टा यांच्यासह अभिनेता रितेश देशमुख यांनी तिचे अभिनंदन केले.
- मोदींनी ट्विटरवरुन साक्षीचं कौतुक केलं. ‘साक्षी मलिकनं इतिहास रचला आहे. संपूर्ण देश खुष आहे. रक्षाबंधनच्या शुभदिनी भारताच्या मुलीनं पदक जिंकून देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. आम्हाला साक्षीचा अभिमान आहे.’

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...