आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षीचा डब्ल्यूआयएम किताब जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुद्धिबळपटू साक्षी दिनेश चितलांगे - Divya Marathi
बुद्धिबळपटू साक्षी दिनेश चितलांगे
औरंगाबाद - जागतिक बुद्धिबळ संघटनचे फिडे अध्यक्ष किर्सन इल्युमझिनॉव यांनी गत सोमवारी जिल्ह्यातील युवा स्टार बुद्धिबळपटू साक्षी दिनेश चितलांगे हिला वुमन इंटरनॅशनल मास्टर डब्ल्यूआयएम हा किताब अधिकृतरीत्या प्रदान केला.
साक्षीने सिंगापूर येथे झालेल्या आसियन बुद्धिबळ स्पर्धेत १८ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून डब्ल्यूआयएमच्या किताबावर नाव कोरले. भारतातील हा किताब मिळणाऱ्या २६ खेळाडूंपैकी साक्षी सर्वात लहान खेळाडू ठरली. आशिया खंडात १५ वर्षे गटात खेळणाऱ्या मुलींमध्ये ती एकमेव डब्ल्यूआयएम खेळाडू आहे हे विशेष.

नैसर्गिक खेळावर भर
मी माझ्या नैसर्गिक व आक्रमक खेळावर भर देते. सरावासाठी पझल्स खेळते व सध्या ध्यानदेखील करत आहे. ज्याचा मला खेळात फायदा होतोय.
साक्षी चितलांगे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू

साक्षीला ३० लाख बक्षीस
जागतिक स्पर्धेत यश मिळणाऱ्या खेळाडूंना शासनातर्फे पदकानुसार रोख बक्षीस मिळते. साक्षीला शासनातर्फे ३० लाखांचे रोख बक्षीस मिळण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मंत्रालयातून मंजुरी मिळताच १५ दिवसांत तिला बक्षीस दिले जाईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...