आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan To Be The Goodwill Ambassador For Indian Contingent At Rio Olympics 2016

ऑलिम्पिक: सलमानच्या निवडीवर भडकला योगेश्वर दत्त, म्हणाला- खेळाडूंना संधी का नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
योगेश्‍वर दत्‍त - Divya Marathi
योगेश्‍वर दत्‍त
नवी दिल्ली - अॉगस्टमध्ये होणाऱ्या रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खान भारतीय पथकाचा सदिच्छा दूत असेल. भारतीय ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच एखाद्या बॉलीवूड स्टारला ऑलिम्पिकसाठी सदिच्छा दूत केले आहे.
योगेश्‍वर दत्‍त भडकला
सलमानच्‍या या निवडीवर भारताचा मल्‍ल योगेश्वर दत्त याने तिखट शब्‍दांत नाराजी व्‍यक्‍त केली. त्‍याने ट्वीट करून म्‍हटले, ''सदिच्‍छा दूताचे काय काम असते, हे मला सांगू शकाल का, देशाच्‍या जनतेला मुर्ख समजता का...

सलमानने सांगितले त्याच्या हिरोंची नावे...
- सदिच्छा दूत बनल्यानंतर माध्यमांशी बोलताना सलमान म्हणाला की, भारतात खेळांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
- सलमान म्हणाला की, माझे स्पोर्टचे हिरो सानिया मिर्झा, विजेंद्र सिंह आणि सुशील कुमार हे आहेत.
- ऑलिंपिकसाठी क्वालिफाय झालेली पहिली जिम्नास्ट दीपा करमाकर हिच्याबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला की, ''मी दीपाची क्लिप पाहिली आहे. तिने तिच्या मेहनतीने या ठिकाणी पोहोचली आहे. ''
- ''जर आपण त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या तर तुम्ही विचार करू शकता की, ती कुठपर्यंत जाईल''
हे खेळाडूसुध्दा उपस्थित होते -
- जेव्हा सलमानची सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधार सरदारसिंग, महिला हॉकी संघाची कर्णधार रितू रानी, बॉक्सर एम सी मेरीकोम, महिला तिरंदाज दीपिका कुमारी, निशानेबाज अपूर्वी चंदीला आणि टेबल टेनिस खेळाडू मणिका बत्रा उपस्थित होत्या.
- शुक्रवारी राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त झालेली बॉक्सर एमसी मेरी कोम म्हणाल्या की, ''ही माझ्यासाठी खुप गौरवास्पद गोष्ट आहे. स्पोर्ट्स आणि एथलीट्ससाठी मी संपूर्ण प्रयत्न करणार आहे.

- ''माझे ऑलिंपिक क्वालिफिकेशन अजून बाकी आहे. मी सध्या क्वालिफाय होण्यावर फोकस करत आहे. यानंतर राज्यसभेबद्दल विचार करेल.''

- मेरी कोम म्हणाल्या की, सलमानचे येणे हे आम्हा सर्वांकरिता आनंदाची गोष्ट आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, सलमानच्या निवडीवर योगेश्वर दत्तने कशा ट्विट्स पोस्ट केल्या... बघा या इव्हेंटचे फोटो....