आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ, रजनीकांत, सलमान सिंधूचे ‘फॅन’; दिग्गजांकडून स्टार सिंधूची स्तुती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीला बॉलीवूडकरांनी सलाम केला आहे. बिग बी अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत आणि सलमान खानसुद्धा सिंधूचे फॅन झाले अाहेत. या दिग्गजांनी सिंधूच्या कामगिरीचे कौतुक केले. ए. आर. रहमान यांनीसुद्धा सिंधूने भारताची शान वाढवली. तिच्या कामगिरीने युवांना प्रेरणा मिळेल, अशी स्तुती केली.

आई, माझा सिंधूसोबत फोटो अाहे...
सलमान खानने िट्वटरवर सिंधूसोबतचा एक फोटो पोस्ट केला. सिंधूने पदक जिंकल्यानंतर त्याने हा फोटो आईला दाखवला आणि म्हणाला.. आई माझा सिंधूसोबत फोटो आहे, बघ. सिंधूने देशासाठी मोठी कामगिरी केली आहे. सिंधू तुझे अभिनंदन, असे सलमानने म्हटले. सलमानने सिंधूचा हा फोटो आणि आईसोबत झालेला हा संवाद टि्वटरवर पोस्ट केला. सलमान भारताच्या रिओ ऑलिम्पिकचा गुडविल अॅम्बेसेडर आहे. भारतीय संघ ऑलिम्पिकला रवाना होण्यापूर्वी सलमान आणि पी.व्ही. सिंधूची भेट झाली होती.
बातम्या आणखी आहेत...