आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Samoa 2015 V Commonwealth Youth Games India At 5th Rank

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रकुल यूथ गेम्स : भारतीय संघ पाचव्या स्थानावर विराजमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अ‍ॅपिया - भारतीय संघाने राष्ट्रकुल यूथ स्पर्धेतील पदकांची लूट शेवटच्या दिवशीही कायम ठेवली. शशिकुमार मुकुंद आणि ध्रुती वेणुगाेपालने भारताला टेनिसमध्ये प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवून दिले. त्यामुळे भारताने शेवटच्या दिवशी शुक्रवारी दाेन सुवर्णपदकांची कमाई करून पदकतालिकेत पाचव्या स्थानावर धडक मारली. यामध्ये भारताने एकूण १९ पदकांसह टाॅप-५ मध्ये हे स्थान पटकावले. यामध्ये ९ सुवर्णांसह चार राैप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे.

शशिकुमार मुकुंद, ध्रुती वेणुगाेपालचे साेनेरी यश
यूथ गेम्सच्या शेवटच्या दिवशी भारताचे युवा खेळाडू शशिकुमार आणि ध्रुती वेणुगाेपाल या दाेघांनी टेनिसमध्ये साेनेरी यश संपादन केले. त्यांनी आपापल्या गटातील एकेेरीची फायनल जिंकून सुवर्णपदकावर नाव काेरले. यापूर्वीही त्यांनी भारताला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मिळवून दिले. शशिकुमारने फायनलमध्ये स्काॅटलंडच्या इवेनचा ६-१, ६-२ ने पराभव केला. तसेच ध्रुतीने नामिबियाच्या लेसेडीवर ६-३, ६-० अशा फरकाने मात केली.

आॅस्ट्रेलिया अव्वल
या पदकतालिकेत आॅस्ट्रेलिया टीम एकूण ६२ पदकांसह अव्वल स्थानावर आहे. यामध्ये आॅस्ट्रेलियाने २४ सुवर्णांसह १९ राैप्य आणि १९ कांस्यपदके जिंकली आहेत. त्यापाठाेपाठ दक्षिण आफ्रिका टीमने ३५ पदकांसह दुसरे स्थान गाठले. तसेच इंग्लंड ४४ पदकांसह तिसर्‍या स्थानावर आहे.