आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप तोमरची ऑलिम्पिकवारी निश्चित, पटकावले कांस्यपदक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उल्लानबाटोर (मंगोलिया)- भारताचा अव्वल मल्ल संदीप ताेमरने रविवारी रिआे अाॅलिम्पिकचा प्रवेश निश्चित केला. त्याने मंगाेलियातील पहिल्या वर्ल्ड अाॅलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत हे यश संपादन केले. त्याने ५७ किलाे वजन फ्री स्टाइल गटात अाॅलिम्पिकाचा काेटा मिळवला. भारताच्या २५ वर्षीय संदीपने या वजन गटात कांस्यपदकाचा बहुमान पटकावला.

अशा प्रकारे अागामी रिआे अाॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला संदीप ताेमर हा भारताचा चाैथा मल्ल ठरला. यापूर्वी याेगेश्वर दत्त (६५ कि., फ्रीस्टाइल), नरसिंग यादव (७४ कि., फ्रीस्टाइल) अाणि हरदीप सिंग (ग्रीकाे राेमन, ९८ कि.) यांनीही अाॅलिम्पिकवारी निश्चित केली अाहे.
येत्या अाॅगस्टमध्ये ब्राझील येथे अाॅलिम्पिक स्पर्धा रंगणार अाहे.

पुरुषांच्या ५७ किलाे वजन गटातील प्ले अाॅफची कुस्ती जिंकून संदीप हा अाॅलिम्पिकसाठी पात्र ठरला. याशिवाय त्याच्या नावे कांस्यपदकाची नाेंद झाली. प्रत्येक वजन गटातील अव्वल तीन मल्लांना अाॅलिम्पिकचा काेटा निश्चित करण्याची संधी हाेती. यामध्ये भारताचा संदीप ताेमर हा यशस्वी ठरला. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी त्याने सरस खेळी करून या यशाला गवसणी घातली.
भारताचे इतर मल्ल या स्पर्धेत सपशेल अपयशी ठरले. महिला गटातही अव्वल कुस्तीपटूंनी निराशा केली.