आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीपने स्वत:चा विक्रम मोडून रचला इतिहास, पायी चालण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत केली कामगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हरियाणाच्या संदीपकुमारने अापल्याच नावे असलेल्या राष्ट्रीय विक्रमाला माेडून राष्ट्रीय पायी चालण्याच्या स्पर्धेमध्ये नवा विक्रम घडवला आहे.  या कामगिरीच्या बळावर त्याने अागामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील अापला प्रवेश निश्चित केला.    
 
संदीपने ३ तास ५५ मिनिट ५९.०५ सेकंदांमध्ये ५० किमीचे अंतर पायी चालून पूर्ण केले. या कामगिरीच्या बळावर त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. यापूर्वी त्याने २०१४ मध्ये चीनच्या तायकाँग येथील अायएएफ वर्ल्ड रेस वाॅकिंग कपमध्ये ३ तास ५६ मिनिट २२ सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केला हाेता. सैन्यदलाच्या जितेंदरसिंगला राैप्यवर समाधान मानावे लागले. त्याने ४ तास २ मिनिट ११.५८ सेकंदांमध्ये अंतर पूर्ण केले.

प्रियंका, इरफानने  पटकावले सुवर्णपदक
अाॅलिम्पियन केटी इरफानने पुरुषांच्या २० किमी पायी चालण्याच्या प्रकारामध्ये सुवर्ण पटकावले. या गटात देवेंद्र अाणि गणपतीने अनुक्रमे राैप्य, कांस्यपदके पटकावली.  महिला गटात अाेएनजीसीच्या प्रियंकाने सुवर्ण जिंकले. तिने एक तास ३७ मिनिट ५८.३८ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. या गटामध्ये शांतीकुमारीने राैप्य व राणीने कांस्यपदक पटकावले.
बातम्या आणखी आहेत...