आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रामसिंगने जिंकली सर्वात माेठी फाइट! कॅनडाच्या खेळाडूला केले पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राेहतक- संग्रामसिंग डेथ काॅन्ट्रॅक्ट साइन करून फाइट जिंकणारा देशातील पहिला प्राेफेशनल कुस्तीपटू ठरला. त्याने शनिवारी रात्री काॅमनवेल्थ हेविवेट कुस्ती स्पर्धेत कॅनडाच्या जाे लेजेंडला धूळ चारली. यासह भारताचा मल्ल हा ५० लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. कॅनडाच्या खेळाडूने दाेन वेळा या स्पर्धेचा किताब पटकावला. मात्र, त्याला भारताच्या संग्रामविरुद्ध सामन्यात सपशेल अपयशाला सामाेरे जावे लागले. भारताच्या संग्रामला राेखण्याचा त्याचा प्रयत्न थिटा पडला.

वर्ल्ड रेसलिंग प्राेफेशनल्सची (डब्ल्यूडब्ल्यूपी) ही फाइट दक्षिण अाफ्रिकेच्या पाेर्ट एलिझाबेथ येथील नेेल्सन मंडेला स्टेडियमवर झाली. तब्बल २२ मिनिटे रंगलेल्या या फाइटमध्ये कॅनडाच्या मल्लाने १० मिनिटे अापले वर्चस्व गाजवले. यादरम्यान, त्याने संग्रामसिंगला अनेक ठिकाणी दुखापती केल्या. त्यानंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या संग्रामने एक जाेरदार फटका मारून कॅनडियन खेळाडूच्या नाकातून रक्त काढले. संग्रामची ही अशाप्रकरची दुसरी लढत ठरली. २०११ मध्येही अशी फाइट केली हाेती. यादरम्यान त्याच्या खांद्याला फॅक्चर झाले हाेते. तसेच त्याने सामनाही गमावला.

‘माझ्या करिअरमधील ही सर्वात माेठी कठीण फाइट ठरली. कॅनडाचा जाे हा सर्वात धाेकादायक अाणि हिंसक झालेला हाेता. माझी हिम्मत प्रत्युत्तर देण्यासाठी वाढली हाेती. तेव्हा अाईचे नाव घेऊन मी जाेरदार प्रत्युत्तर दिले अाणि विजय मिळवला, असे राेहतकचा मदिना येथील रहिवासी संग्रामने ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवर सांगितले. यामुळे अात्मविश्वास दुणावल्याचे त्याने सांगितले.

फाइट जिंकल्यानंतर किताबासह रिंगमधून बाहेर पडताना भारताचा संग्रामसिंग.
रिअॅलिटी शाेमध्ये झाला सहभागी बिग बाॅसचा फायनलिस्ट राहिलेला ३० वर्षीय संग्रामने सर्व्हायर इंडिया, सच का सामना, बिग बाॅस, नच बलियेसारख्या रिअॅलिटी शाेमध्येही सहभाग घेतला. यापूर्वी त्याने जाेनी रेंज बिग फाइव्ह रेसलिंग (दक्षिण अाफ्रिका) अाणि अाॅल इंडिया अाेपन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये (दिल्ली) उल्लेखनीय कामगिरीसह सुवर्णपदकाची कमाई केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...