आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया-हिंगीसचा सलग 29 विजयांचा कीर्तिमान !, 22 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस यांनी सलग २९ वा विजय मिळवून पोर्टोरिकोची गिगी फर्नांडिस आणि बेलारूसची नताशा जवेरा यांचा ११९४ मध्ये केलेला २८ सलग विजयांचा विक्रम मागे टाकला. सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस जोडी सध्या १९९० मध्ये हेलेना सुकोवा-याना नोवोत्वा यांनी केलेल्या ४४ विजयांच्या विक्रमापासून अद्याप दूर आहे.

अव्वल मानांकित सानिया-हिंगीसने रोमानियाची रालुका ओलारू आणि कझाकिस्तानची याराेस्लावा श्वेडोवा जोडीला ४-६, ६-३, १०-८ ने हरवले. सानिया-हिंगीसने गिगी फर्नांडिस (अमेरिका) आणि नताशा जवेरा (बेलारूस) यांच्या १९९४ मध्ये केलेला सलग २८ विजयांचा विक्रम मोडला. आता सानिया-हिंगीसच्या नजरा १९९० मध्ये केलेल्या ४४ सलग विजयांच्या विश्वविक्रमावर टिकून आहेत. हा विश्वविक्रम याना नोवोत्ना आणि हेलेना सुकोवा यांच्या नावे आहे. नताशा आणि गिगी यांनासुद्धा ४४ सामने जिंकण्याचा विक्रम मोडता आला नाही. सानिया मिर्झा-मार्टिना हिंगीस जोडी २९ विजयांसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

जगातली नंबर वन महिला दुहेरीची खेळाडू सानिया आणि दुसऱ्या क्रमांकावरची खेळाडू हिंगीस या वर्षी आपल्या सलग दुसऱ्या किताबापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. दोन आठवड्यांपूर्वी दोघींनी ब्रिस्बेन इंटरनॅशनलमध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावले होते. सानियाने मागच्या वर्षी हिंगीससोबत जोडी केली होती. तेव्हापासून ही जोडी सुपरहिट ठरली आहे. दोघींनी मागच्या वर्षी दोन ग्रँडस्लॅम विम्बल्डन आणि यूएस ओपनसह एकूण ९ विजेतेपदे जिंकली होती. आता वर्षाच्या सुरुवातीला दोघींनी ब्रिस्बेनमध्ये बाजी मारली.

सेमीफायनलमध्ये संघर्ष
सिडनी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सानिया-हिंगीसला सेमीत चांगलाच घाम गाळावा लागला. दोघींनी पहिला सेट ४-६ ने गमावला. यानंतर दुसऱ्या सेटमध्येही दोघी १-२ ने मागे होत्या. यानंतर सानिया-हिंगीसने जबरदस्त पुनरागमन करताना दुसरा सेट ६-३ ने जिंकला. सामना १-१ ने बरोबरीत आला. यानंतर सुपर टायब्रेकरमध्ये सानिया-हिंगीसने १०-८ ने बाजी मारली.

हा सामना कठीण होता. आम्ही नेहमी सुपर टेनिस खेळू शकत नाही. मात्र, आम्ही असा खेळ करण्यात सक्षम आहोत म्हणूनच जगातील नंबर वन जोडी आहोत.
मार्टिना हिंगीस.

प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही सेट गमावला. मात्र, आम्ही सलगपणे एकमेकींची मदत करत असतो. हा संघर्षमय विजय होता.
सानिया मिर्झा.
बातम्या आणखी आहेत...