आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानियाला ब्रिस्बेन ओपनचा किताब; नंबर वनचे सिंहासन मात्र गमावले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन- भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने अमेरिकेच्या बेथानी माटेक सँडस्््सोबत ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या रूपात आपला सत्रातील पहिला किताब जिंकला. मात्र, यावेळी तिने जागतिक क्रमवारीतील आपली महिला दुहेरीतील नंबर वनची रँकिंग गमावली. भारताची सानिया आणि अमेरिकेच्या बेथानी माटेक या अव्वल मानांकित जोडीने फायनलमध्ये एकेतेरिना मकारोवा आणि एलेना वेस्निना या रशियाच्या दुसऱ्या मानांकित जोडीला सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ ने हरवले.
 
या विजयानंतरही डब्ल्यूटीए रँँकिंगमध्ये जगातील महिला दुहेरीची नंबर वन खेळाडू म्हणून सानियाचा ९१ आठवड्याचा प्रवास खंडीत झाला. आता बेथानी माटेक सँडस्् नंबर वनच्या सिंहासनावर विराजमान झाली आहे. विजयानंतर सानिया म्हणाली, ‘मी जणू काही मिस वर्ल्डचा नंबर वनचा किताब सोपवत आहे, असे मला वाटत आहे. माझी सर्वांत चांगली मैत्रिण आा जोडीदारला धन्यवाद.’

निशिकाेरी-दिमित्राेव फायनल रंगणार
पुरुष एकेरीच्या किताबासाठी जपानचा केई निशिकाेरी अाणि बल्गेरियाचा दिमित्राेव यांच्यात फायनल रंगणार अाहे. या दाेघांनीही अापापल्या गटातील उपांत्य सामन्यात विजय मिळवला. यासह त्यांनी अंतिम फेरी गाठली. तिसऱ्या मानांकित निशिकाेरीने सेमीफायनलमध्ये स्विसच्या स्टॅन वावरिंकाला धूळ चारली. त्याने ७-६, ६-३ ने सामना जिंकला. पराभवामुळे दुसऱ्या मानांकित वावरिंकाला पॅकअप करावे लागले. विजयासह निशिकाेरीने फायनल गाठली. दुसरीकडे दिमित्राेवने उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित मिलाेस राअाेनिकचे अाव्हान संपुष्टात अाणले. त्याने ७-६, ६-२ ने विजय मिळवला.

प्लिसकोवाला विजेतेपद
चेक गणराज्याच्या कॅराेलिना प्लिसकाेवाने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. तिने फायनलमध्ये फ्रान्सच्या अलिझा कार्नेटवर ६-०, ६-३ ने एकतर्फी विजय संपादन केला. यासह तिने किताब अापल्या नावे केला. कार्नेट उपविजेती ठरली. तिने दिलेली झुंज अपूरी ठरली.
 
 
बातम्या आणखी आहेत...