आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया-मार्टिना डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एस्टबाेर्न - अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीसने राेमहर्षक विजयासह डब्ल्यूटीए अ‍ॅगाेन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या जाेडीने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात तीन सेटमध्ये विजय मिळवला. सानिया-मार्टिनाने लढतीमध्ये तैपेईच्या चान आणि इटलीच्या पेनेट्टाचा ४-६, ६-३, १०-६ अशा फरकाने पराभव केला. यासाठी अव्वल मानांकित जाेडीला एक तास १३ मिनिटे झंुज द्यावी लागली. मात्र, सरस खेळी करून या जाेडीने अंतिम आठचा सामना आपल्या नावे केला.

बिगरमानांकित चान आणि पेनेट्टाने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. यासह त्यांनी सामन्यात आघाडी मिळवली. मात्र, या जाेडीला लढतीमधील ही आघाडी फार काळ टिकवून ठेवता आली नाही.

दुसर्‍या सेटमध्ये सानिया आणि मार्टिनाने दमदार पुनरागमन केले आणि लढतीमध्ये बराेबरी साधली. त्यानंतर दाेन्ही तुल्यबळ खेळाडूंमधील ही लढत तिसर्‍या सेटमध्ये अधिकच रंगली हाेती. ट्रायब्रेकरपर्यंत खेचल्या गेलेल्या या सेटमध्ये १०-६ ने बाजी मारून सानिया-मार्टिनाने सामना आपल्या नावे केला. यापूर्वी त्यांनी गत सामन्यात एकतर्फी विजयाची नाेंद केली हाेती. त्यामुळे त्यांना अंतिम आठमधील सामन्यात बाजी मारता आली आहे.

फायनलची आता संधी!
सलगच्या शानदार विजयाची माेहिम कायम ठेवताना अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जाेडीचा उपांत्य सामना कॅराेलिना गार्सिया-कॅटरिनाशी हाेईल. या सामन्यातील विजयासह अव्वल मानांकित जाेडीला जेतेपदाच्या लढतीसाठी आपले आव्हान सादर करता येईल. उपांत्यपूर्व सामन्यातील विजयाच्या बळावर सानिया आणि मार्टिनाने महिला दुहेरीच्या विजेतेपदावरचा दावा आता अधिक प्रबळ केला आहे.
बातम्या आणखी आहेत...