आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Hingis Extends Unbeaten Streak To 41 Matches

सानिया-हिंगीस जोडीचा सलग ४१ वा विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोहा - डब्ल्यूटीए कतार ओपन टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा व तिची स्विस जाेडीदार मार्टिना हिंगीस यांनी चीनची जोडी यी फान झू-सैसाई झेंग यांची झंुज मोडीत काढून सलग ४१ व्या विजयाची नोंद केली.

अग्रमानांकित इंडो-स्विस जोडीने एक तास २४ मिनिटे रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात ६-४, ४-६, १०-४ असे तीन सेटमध्ये चिनी जोडीला नमवून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. विजयी जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. यंदा सानिया-हिंगीस जोडीने चार विजेतेपदांवर नाव कोरले. त्यामुळे त्यांच्या जेतेपदांची संख्या १३ पर्यंत वाढली आहे. वर्षाची सुरुवात या जोडीने ब्रिस्बेन व सिडनी येथील स्पर्धेत यश मिळवून केली. त्यानंतर आॅस्ट्रेलियन ओपन जिंकून ग्रँडस्लॅम किताबांची हॅट्ट्रिक पूर्ण केली. या दोघींनीही काही दिवसांपूर्वी सेंट पीटर्सबर्गचे जेतेपदही पटकावले आहे. या सामन्यापूर्वी वेळ काढून सानियाने येथील डीपीएस माॅडर्न इंडियन स्कूलला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.