आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania hingis In Quarter Final In Australian Open

ऑस्ट्रेलियन ओपन: सानिया-हिंगीस जोडीची क्वार्टर फायनलमध्ये धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - अव्वल मानांकित भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. दुसरीकडे भारताच्या रोहन बोपन्नाने तैपेईच्या युंग जान चानसोबत मिश्र दुहेरीत अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे.

सोमवारी वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत चौथा मानांकित स्वित्झर्लंडच्या स्टान्सिलास वावरिंकाचा धक्कादायक पराभव झाला. त्याला कॅनडाच्या मिलोस राओनिकने स्पर्धेबाहेर केले. दुसरीकडे दुसरा मानांकित इंग्लंडच्या अँडी मरेने सहजपणे क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने रशियाची स्वेतलाना कुज्नेत्सोवा आणि इटलीची रॉबर्टो विंसी यांना ६-१, ६-३ ने मात दिली. सानिया-हिंगीसने हा सामना एक तास २० मिनिटांत जिंकला. या दोघींनी सामन्यांत १३ पैकी पाच ब्रेक पॉइंट मिळवले. शिवाय ३८ विनर्सही मारले. सानिया-हिंगीसला क्वार्टर फायनलमध्ये अॅना लीना ग्रोएनफील्ड (जर्मनी) आणि कोको वानडेवेघे (अमेरिका) यांच्याशी लढायचे आहे. मिश्र दुहेरीत बोपन्ना आणि चान यांच्या तिसऱ्या मानांकित जोडीने चेकची आंद्रिया लावाकोवा आणि पोलंडचा लुकास कुबोट यांना ४-६, ६-३, १०-६ ने पराभूत केले.

वावरिंका स्पर्धेबाहेर : राओनिकने २०१४ चा चॅम्पियन वावरिंकाला पाच सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात ६-४, ६-३, ५-७, ४-६, ६-३ ने पराभूत करून स्पर्धेबाहेर केले. राओनिकने हा सामना ३ तास आणि ४४ मिनिटांत जिंकला. राओनिकने २४ ऐस आणि ८२ विनर्स मारून सामना गाजवला. २३ वा मानांकित मोंफिल्सने रशियाच्या आंद्रे कुज्नेत्सोवाला ७-५, ३-६, ६-३, ७-६ ने मात दिली. मोंिफल्सने पहिल्यांदा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मरेने ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिकला ६-४, ६-४, ७-६ ने हरवले.

अजारेंका, कर्बर समोरासमोर : १४ वी मानांकित अजारेंका आणि सातवी मानांकित कर्बर क्वार्टर फायनलमध्ये समोरासमोर असतील. अझारेंकाने चेक गणराज्यच्या बारबरा स्ट्रायकोवाला ६-२, ६-४ ने मात दिली. दुसरीकडे कर्बरने जर्मनीच्या एनिका बेकला ६-४, ६-० ने हरवत क्वार्टर फायनलमध्ये सहज प्रवेश केला.

क्वार्टर फायनल लाइनअप
पुरुष एकेरी

योकोविक-निशिकोरी
फेडरर-बर्डिच
मांेफिल्स-राओनिक
मरे-फेरर

महिला एकेरी
सेरेना-शारापोवा
रदवांस्का-नवारो
कर्बर-अझारेंका
कोंटा-शुआई जेंग