आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया-हिंगीसची मानांकनात घसरण, क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नुकत्याच जाहीर झालेल्या टेनिसच्या क्रमवारीतून भारताची सानिया मिर्झा आणि तिची दुहेरीची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांची जोडी म्हणून अव्वल स्थानावरून घसरण झाली आहे. मात्र, वैयक्तिक म्हणून दुहेरीच्या क्रमवारीत सानिया पहिल्या, तर हिंगीस दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

फ्रेंच ओपन स्पर्धा संपल्यानंतर सोमवारी टेनिसची सुधारित यादी जाहीर झाली. यात पुरुष एकेरीच्या क्रमवारीत भारताचा युकी भांबरी एका स्थानाच्या घसरणीसह १५७ व्या क्रमांकावर पोहोचला. भारताचा सोमदेव देववर्मन चार स्थानांच्या घसरणीसह १७३ व्या क्रमांकावर आला. दुहेरीच्या क्रमवारीत रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस यांना प्रत्येकी ३ स्थानांचे लाभ झाले. बोपन्ना आता १८ व्या तर पेस २४ व्या क्रमांकावर आहे.

सेरेना अव्वलस्थानी
चॅम्पियन सेरेना अव्वल स्थानी कायम आहे. क्वितोवा दुसऱ्या क्रमांकावर, तर शारापोवाची चौथ्या स्थानी घसरण झाली. सिमाेना तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. चेक गणराज्यची लुसी सफारोवाने सातवे स्थान मिळवले आहे.