आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया-हिंगिसचा सलग 36 वा विजय, जिंकला ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयानंतर सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस(डावीकडून). - Divya Marathi
विजयानंतर सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस(डावीकडून).
मेलबर्न- भारतीय टेनिसपटूसानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिसने ऑस्ट्रेलियन ओपनचा महिला दुहेरीचा किताब पटकावला. या जोडीने झेक गणराज्याच्या आन्द्रिया लावाकोवा आणि लूसी रादेकाचा पराभव केला. यंदा दोघींनी ब्रिस्बेन इंटरनॅशनल ओपनही जिंकले आहे. हा सानिया-हिंगिसची सलग 36 वा विजय आहे.
अंतिम फेरी कशी होती?
- सानिया-हिंगिसच्या जोडीने पहिला सेट 7-6 ने जिंकला.
- दुस-या सेटमध्‍ये झेक जोडीचे प्राबल्य राहिले. झेक गटाला 2-0 ने आघाडी घेतली होती.
- दुसरा सेट 6-3 ने जिंकून सानिया-मार्टिना या जोडीने आघाडी घेऊन किताब जिंकला.

मिश्र दुहेरीतही सानियाचा विजय
- गुरुवारी सानियाने मिश्र दुहेरीच्या उपांत्य सामान्यात बाजी मारली होती.
- सानिया आणि क्रोएशियाची इवान डोडिगच्या जोडीने क्वार्टरफाइनलमध्‍ये लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिसला 73 मिनिटांमध्‍ये 7-6 आणि 6-3 ने हरवले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सानिया-हिंगिसची जल्लोष करतानाची छायाचित्रे...