आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Martina Clinched Ninth Tennis Title In A Year

सानिया-मार्टिनाचे नववे विजेतेपद, डब्ल्यूटीए फायनल्समध्ये किताबी विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - जगातली नंबर वन जोडी सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची तिची जोडीदार मार्टिना हिंगीस यांनी शानदार प्रदर्शन कायम ठेवताना डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत किताबी विजय मिळवला आहे. सानिया-हिंगीस जोडीचे हे वर्षातील नववे विजेतेपद ठरले आहे. सानियाने या स्पर्धेच्या विजेतेपदाचा किताब कायम ठेवला. मागच्या वर्षी सानियाने झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसोबत येथे विजेतेपद मिळवले होते. सानिया-हिंगीसने फायनलमध्ये स्पेनची गरबाईन मुगुरुजा आणि कार्ला सुआरेज नवारो या जोडीला एका तासात ६-०, ६-३ ने हरवले.

दहावे विजेतेपद
जागतिक क्रमवारीत नंबर वन सानियाचे हे वैयक्तिक पातळीवर २०१५ मधील दहावे विजेतेपद ठरले. सानिया-हिंगीसचे हे वर्षातील दहावे फायनल होते. डब्ल्यूटीए फायनलच्या आधी या जोडीने इंडियन वेल्स, मियामी ओपन, चार्ल्सटन, ग्वांगझू, वुहान, बीजिंगसह विम्बल्डन आणि यूएस ओपनचे ग्रँडस्लॅम किताबही जिंकले आहे. रोम ओपनमध्ये दोघी उपविजेत्या ठरल्या होत्या.

हिंगीसचे करिअरचे ५० वे विजेतेपद
आपल्या करिअरच्या सर्वोत्तम वर्षात सानियाने जेथे वैयक्तिक पातळीवर दहा विजेतेपद जिंकले तेथे तिची जोडीदार मार्टिना हिंगीसचे हे करिअरमधील ५० वे डब्ल्यूटीए दुहेरीचे विजेतेपद ठरले. अशी कामगिरी करणारी ती जगातली १६ वी खेळाडू ठरली आहे.

सलग २२ सामन्यांत अजेय
सानिया-हिंगीसने या विजयासह आपले अजेय अभियान २२ सामन्यांपर्यंत पोहोचवले आहे. यात त्यांनी एकही सेट गमावला नाही.

पहिल्या सेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन
जगातली नंबर वन जोडी सानिया-हिंगीसने पहिल्या सेटमध्ये जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या सेटमध्ये या जोडीने एकही गेम गमावला नाही. शानदार सर्व्हिस, जबरदस्त कोर्ट कव्हरेज, अप्रतिम ग्राउंड स्ट्रोकच्या बळावर िवरोधी जोडीला पुरते नामोहरम केले. त्यांनी पहिला सेट ६-० ने जिंकला.

दुसरा सेट आव्हानात्मक
दुसऱ्या सेटमध्ये अव्वल मानांकित जोडीला थोडे आव्हान मिळाले. मात्र, सानिया-मार्टिनाने विरोधी जोडीचे आव्हान मोडताना दुसरा सेट ६-३ ने जिंकला. या सेटच्या विजयासह या जोडीने वर्षातील नववे विजेतेपद निश्चित केले. सानिया-हिंगीसने ११ पैकी ५मध्ये विरोधी जोडीचे सर्व्हिस मोडून काढत सामन्यावर पकड मिळवली.