आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza And Martina Hinges Won Second Title In Year

सिडनी अाेपन टेनिस : सानिया-मार्टिना चॅम्प; बाेपन्ना फायनलमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - जगातील नंबर वन सानिया मिर्झा अाणि मार्टिना हिंगीस शुक्रवारी सिडनी अाेपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरल्या. या जाेडीने महिला दुहेरीचा किताब पटकावला. त्यांनी फायनलमध्ये कॅराेलिना गार्सिया अाणि क्रिस्टिनावर मात केली. सानिया अाणि मार्टिनाने १-६, ७-५, १०-५ अशा फरकाने सामना जिंकला.

फाॅर्मात असलेल्या या जाेडीने अवघ्या एक तास १३ मिनिटांमध्ये विजयाची नाेंद केली. यासह त्यांनी सत्रात सलग दुसऱ्या किताबावर नाव काेरले. यापूर्वी गत अाठवड्यात ही जाेडी ब्रिस्बेन अांतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या जेतेपदाची मानकरी ठरली. किताबासह सानिया अाणि मार्टिनाने अागामी अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेतही बाजी मारण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. येत्या १८ जानेवारीपासून सत्रातील पहिल्या ग्रँडस्लॅम अाॅस्ट्रेलियन अाेपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे.

मरे-ब्रुनाे विजयी
इंग्लंडचा जेमिई मरे अाणि ब्राझीलच्या ब्रुनाेने उपांत्य सामना जिंकून फायनल गाठली. या जाेडीने दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये लुकास कुबाेट अाणि मार्सि मात्काेवास्कीचा पराभव केला. त्यांनी रंगतदार सामन्यात ७-५, २-६, १०-३ अशा फरकाने विजयाची नाेंद केली.

राेहन बाेपन्नाला विजेतेपदाची संधी
गत चॅम्पियन राेहन बाेपन्नाने फ्लाेरीन मर्जियासाेेबत अंतिम फेरी गाठली. त्याला सत्रात पहिल्याच किताबाची संधी अाहे. मर्जियासाेबत राेहन बाेपन्नाने ७-६, ६-२ अशा फरकाने उपांत्य सामना जिंकला. त्यांनी थाॅमस व मेयरचा पराभव केला. गतवर्षी त्याने या स्पर्धेत डॅनियल नेस्टरसाेबत पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले हाेते.